Breaking News

जिओ टॉवरच्या नेटवर्क समस्येमुळे ग्राहकांची वाढली डोकेदुखी – अजित सुकारे

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

* जियो ची सेवा सुरळीत न झाल्यास टावर बंद पाळू – अजित सुकारे सामाजिक कार्यकर्ता,आंदोलनाचा दिला इशारा *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- राज्य सरकारने सर्वसामान्यांची काम त्वरित व्हावे, यासाठी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू केले आहे. मात्र, ग्रामीण भागात नेटवर्क सेवा मिळत नसल्याने शासकीय कामासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. ही नेटवर्क सेवा सुरळीत राहावी म्हणून जिओ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी टॉवर मध्ये सुधारणा करावी, अशी मागणी अजित सुकारे,सामाजिक कार्यकर्ता, व मोठेगाव ग्रामस्थांनी केली आहे.तालुक्यातील मोटेगाव येथे जिओ कंपनीने मोबाईल नेटवर्कचे टावर उभे केलेले आहे. मात्र, नेटवर्क योग्यरितीने मिळत नसल्याने ऑनलाईनच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. यामुळे शासकीय कामे थांबली आहेत. तसेच नुकतीच सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू केल्यानंतर केवायसी व कागदपत्रे सादर करण्यासाठी महिलांची धावपळ सुरू झाली आहे. मात्र, नेटवर्क नसेल तर तो स्मार्टफोन काय? कामाचा अशी अवस्था मोटेगाव परिसरात दिसून येत आहे.

सरकारने नुकत्याच अनेक शासकीय योजना सुरू केल्या आहे. घरबसल्या नागरिकांना या योजनाचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे ओळखीच्या नागरिकांकडून अर्ज भरून बँक व लाडकी बहीण योजनेचे केवायसी करणे सुरू आहे. मात्र, नेटवर्क नसल्याने मोबाईलचे काम काहीच राहत नाही. अनेक शासकीय कामात खोळंबा होत आहे. मोठेगाव व परिसरातील नागरिकांना, महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
ग्रामीण भागातील अनेक नागरिक व महिलांनी शासकीय योजनांचे फार्म घरबसल्या परिचित नागरिकांकडून भरण्याची तयारी सुरू केली आहे. दिवस व रात्रीच्या वेळात नेटवर्क राहत नसल्याने परिसरातील ग्रामस्थ व शासकीय योजनेचे लाभ घेणारे नागरिक हैराण झाले आहेत.नेटवर्क नसल्याने इंटरनेट देखील वापरता येत नाही.

सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळाले पाहिजे म्हणून शासनाने अनेक विभाग सक्रिय केलेले आहेत. परंतु नेटवर्क अभावी वेळेवर कामे होत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे जिओ कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन मोठेगाव येथील टॉवर टावर चे काम सुरळीत करून परिसरातील नागरिकांना चांगली सेवा उपलब्ध करुन द्यावी,
अशी मागणी अजित सुकारे सामाजिक कार्यकर्ता, व मोठेगाव येथील ग्रामस्थांनी केलेली आहे.जर येणाऱ्या काही दिवसात जियो टावरचं काम सुरळीत झालं नाही तर टावर बंद पाळण्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

एसआयआर अंतर्गत 100 टक्के घरोघरी जाऊन होणार मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved