Breaking News

धुलीवंदना निमित्ताने भव्य दिव्य रामधुन रॅली काढण्यात आली

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

 

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- आज दिनांक 03 मार्च 2026 रोजी धुलीवंदना निमित्त श्री गुरुदेव सेवा मंडळ गोडबोरी त. भिवापूर येथे सामुदायिक ध्यान प्रार्थना रामधून काढण्यात आली. धुलीवंदन म्हटले की, सर्व तरुण वर्गामध्ये उत्सव हा संचारला असतो, रंग, डीजे चा झिंगाट, व्यसन, आणि त्या व्यसनातून समाजात वाईट वृत्ती, प्रामुख्याने धुलीवंदना निमित्त संपूर्ण देशामध्ये आगळे वेगळे चित्र पाहायला मिळते, पण याला अपवाद म्हणजे श्री गुरुदेव सेवा मंडळ गोंडबोरी येथे सलग ६६ वर्षापासून वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेवर आधारित धुलीवंदना चा कार्यक्रम पार पडत असते. पहाटे संपूर्ण गाव स्वच्छ करून, गावातील घाण ही होळीच्या माध्यमातून गावाबाहेर जाळण्यात आली. त्यानंतर गुरुदेव सेवक स्वच्छ कपडे परिधान करून, हनुमान मंदिर येथे एकत्रित येऊन सामुदायिक ध्यान प्रार्थने चा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर सर्व गुरुदेव सेवक संपूर्ण गावांमध्ये भजनाच्या माध्यमातून, आणि श्री गुरुदेव च्या जयघोषात संपूर्ण गावांमध्ये रामधून काढण्यात आली. रामधूनीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. हनुमान मंदिर जवळ पोहोचतात तिथे महाराजांच्या आदेश्याप्रमाने चांगल्या विचारांची आधान-प्रधान करण्याकरिता सभेत रूपांतर झाले.

आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामगीता प्रचारक श्री. मेघनाथजी साहरे साहेब सेवानिवृत्त सहाय्यक गटविकास अधिकारी उमरेड पंचायत समिती प्रामुख्याने उपस्थित झाले.त्यांनी ग्रामगीतेवर आधारित होळीचे महत्व व्यक्त केले. महाराजांच्या उक्तीप्रमाणे !
*देशभक्ती हीच, देव भक्ती* असा प्रण उद्घोशित केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुलाबरावजी वैद्य, समारोपीय मार्गदर्शन माजी सरपंच प्रभाकरजी माळवे यांनी केले.संचालन ॲड.राहुल टाले,कार्यक्रम यशस्वी ते करिता किसनजी टाले,अरुणजी टाले,डॉ.धीरज राऊत, अमृत माडवे,घनश्याम माडवे, अमोल सोनटक्के,नितेश मेश्राम, अरविंद चिकराम,गौरव टाले,नामदेव शेंडे,रुपेश मेश्राम,प्रमय माळवे, विष्णू जांभुळे,कुश टाले, सुदर्शन माळवे,महिला दुर्गा शेंडे,रंजना सोनटक्के, जयाबाई माडवे,सकवार बाई माडवे,कविता वाकडे,ताराबाई चिकराम, संगीता वाकडे,मालाबाई टाले,सोनाली सोनटक्के,वैजू टाले,

*केली होती होळीने जाणा । परि दुःख न प्रल्हादप्राणा । हरिभक्त म्हणोनि । शेवटी छळणारेचि जळले हे गावासि कौतुक झाले । म्हणोनि जन ओरडले उपहास त्यांचा करोनि ॥ त्याच दिवशी शंकराने । काम जाळिला तिसऱ्या नयने । म्हणोनि कामास धिक्कारिले भूतसेनेने हलकल्लोळ करोनि ।। त्याच दिवशी सज्जनांनी वार्षिक यज्ञाची केली आखणी । संपूर्ण गाव साफ करोनि । द्यावे पेटवोनि कैचण ते* ।।
– वं राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ग्रामपंचायत कार्यालय मोहाळी (नलेश्वर) च्या कोंडवाड्याच्या जागेवर अतिक्रमण

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

नागरिकांनी महाराजस्व अभियानाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved