Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
* चिमूर क्रांती भुमीतील लेकींच्या सहभागाने रचला इतिहास – चंद्रपूरच्या लावणीचा जागतिक विक्रम *
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर/चिमूर :- चंद्रपूर जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवाला जागतिक मान्यता मिळवून देणारा ऐतिहासिक क्षण नुकताच साकार झाला. तब्बल २७०० पैकी २४३२ महिला व युवतींनी एकत्रित लावणी सादर करत गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आणि चंद्रपूरचे नाव जगभरात अभिमानाने झळकावले.या विक्रमात चिमूरच्या लेकींचा उत्स्फूर्त आणि उल्लेखनीय सहभाग ठरला.उत्कृष्ट महिला मंच चंद्रपूरच्या अध्यक्षा छबुताई वैरागडे यांच्या नेतृत्वात चांदा क्लब ग्राऊंड येथे आयोजित या भव्य कार्यक्रमात जिल्हाभरातील महिलांनी सहभाग घेतला. यापूर्वीचा १३२६ महिलांचा विक्रम मोडीत काढत २४३२ मातृशक्तींनी अस्सल लावणी नृत्य पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरित्या सादर करत नव्या विश्वविक्रमाची सुवर्ण नोंद केली.

पारंपरिक साज, ठेका, एकसंध हालचाली आणि शिस्तबद्ध सादरीकरणामुळे हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरला.या उपक्रमात ट्रान्सफाम डान्स अकॅडमी, चिमूरच्या विद्यार्थिनींनी कोरिओग्राफर तेजस मिसार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी लावणी सादर केली.त्यांच्या अथक मेहनती, सराव आणि कलात्मक सादरीकरणामुळे चिमूरचे नावही जागतिक विक्रमाच्या पानावर कोरले गेले.विक्रमाची अधिकृत घोषणा होताच चिमूर शहरात आनंदोत्सव उसळला. लावणी टीमचे शहरात आगमन होताच नगरसेविका दुर्गा सातपुते यांनी पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन कलाकारांचे स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरात बालाजी मंदिर येथून भव्य रॅली काढण्यात आली. शहरातील मुख्य मार्गांवर नागरिकांनी पुष्पवृष्टी करत कलाकारांचा गौरव केला. रॅलीचा समारोप श्रीहरी बालाजी महाराज यांच्या दर्शनाने करण्यात आला. यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह, नगर परिषद चिमूर येथे नगराध्यक्ष गीता लिंगायत यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपाध्यक्ष संजय नवघडे, नगरसेविका नीता लांडगे, दुर्गा सातपुते उपस्थित होत्या. तसेच पोलिस स्टेशन चिमूर येथे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे व पोलिस उपनिरीक्षक दीप्ती मरकाम यांच्या उपस्थितीतही कलाकारांचा गौरव करण्यात आला.चंद्रपूरच्या लावणीने विश्वविक्रम प्रस्थापित करत परंपरा, संस्कृती आणि महिला शक्तीचा भव्य आविष्कार सादर केला. चिमूरच्या लेकींच्या सहभागामुळे हा क्षण अधिकच अभिमानास्पद ठरला असून संपूर्ण जिल्ह्यात आनंद आणि अभिमानाची लाट उसळली आहे.
ज्वाला समाचार सच का सामना