Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :– “मानवी जीवनाला दिशा देणारा रामाचा आचार आणि जीवन जगण्याची कला शिकवणारा कृष्णाचा विचार या दोन्हींचा संगम म्हणजेच रामकृष्ण हरी होय,” असे मार्मिक आणि भावस्पर्शी प्रतिपादन ह.भ.प. स्नेहल पित्रे यांनी आपल्या प्रवचनातून श्रीहरी बालाजी महाराज घोडा यात्रा प्रसंगी गोपाल काल्याचे कीर्तनात केले. भक्तिभावे ओथंबलेल्या वातावरणात बोलताना त्यांनी सांगितले की, प्रभू राम हे आदर्श जीवनाचे प्रतीक असून त्यांचा आचार म्हणजे सत्य, संयम, त्याग आणि कर्तव्यनिष्ठा आहे. तर श्रीकृष्णांचे विचार मानवाला परिस्थितीशी लढण्याची ताकद देतात, कर्मयोगाचा मार्ग दाखवतात आणि जीवन आनंदाने जगण्याची प्रेरणा देतात.
आजच्या धकाधकीच्या जीवनात केवळ विचार नव्हे तर आचारही तितकाच महत्त्वाचा आहे. रामाचा आचार अंगीकारला आणि कृष्णाचा विचार मनात रुजवला तर जीवन निश्चितच सुंदर, सुसंस्कृत आणि यशस्वी होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. नारदीय कीर्तना दरम्यान उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले होते. “रामकृष्ण हरी” या घोषाने परिसर भक्तिमय झाला असून, उपस्थितांनी ह.भ.प. स्नेहल पित्रे यांच्या विचारांना भरभरून दाद दिली.
ज्वाला समाचार सच का सामना