Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar.in
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर तालुक्यातील चकलोहारा मागील 30 वर्षापासून चकजाटेपार टी पोइंट ते चकलोहारा या मुख्य रस्ता अनेक वर्षांपासून खराब स्तीतीत आहे. गेल्या 30 वर्षा पासून या रस्त्याची कोणतीही दुरुस्ती अथवा बांधकाम झाले नाही पावसाळ्यात रस्ता चिखलाने भरतो वाहन व पायदळ जाने कठीन झाले आहे शाळेकरी मुलांना, लोकांना व रुग्णांना जाण्या येण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. कित्येक वेळा सायकल, मोटार सायकल ने खाली पडून अपघात होऊन दुखापत झालेले आहे.

आम्ही अनेक वेळा चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. बंटीभाऊ भांगडिया यांना निवेदने देऊन व प्रत्येक्ष भेटून याची माहिती दिली आहे पण त्यांनी आश्वासन दिले पंरतू काहीच केलेलं नाही व कोणत्याच बांधकाम कार्यालयातून आज पर्यंत काहीच कार्यवाही केलेली नाही उलट गावकऱ्यांची फसवणूक झाली असे निदर्शनात आले आहे .रस्ता दुरुस्ती करण्यासाठी टाळाटाळ होत असून
संपूर्ण चकलोहारा गावातील सर्व नागरिकांच्या एकमताने ठरविले आहे कि जो पर्यंत आमच्या गावचा रस्ता तयार होत नाही तो पर्यंत आम्ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व इतर सार्वजनिक निवडणुकीस मतदानाचा बहिष्कार करू, असे निवेदन चिमूर तहसिलदार यांच्या
मार्फत प्रतिलीपी जिल्हाधिकारी चंद्रपूर ,बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य , पालकमंत्री चंद्रपूर, आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर, उपविभागीय अभियंता ( P W D )
उपविभागीय अभियंता ( ZP ) उपविभागीय अधिकारी चिमूर , यानां दिले आहे त्यावेळी
किशोरची घोळमोडे, शुभम मंडपे, संदीप ठाकरे , विशाल चौधरी, अतुल चौधरी, देवा मेश्राम प्रफुल चौधरी , उपस्थित होते .
ज्वाला समाचार सच का सामना