Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar.in
* तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले निर्देश *
* पहिल्यांदाच खासदार पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर *
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर : – दिनांक ६ सप्टेंबर २०२५ ला गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी चिमूर तालुक्यातील खडसंगी, रेंगाबोडी, चिचघाट, जामणी, आमडी, खुरसापार, खापरी, भिवकुंड, बोथली, खाणगा सावरी, वहानगाव या गावांना भेट देऊन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी बांधावरच संवाद साधला. शेतकऱ्यांनी सोयाबीन, कपाशी, या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची व्यथा खासदारांसमोर मांडली. यावेळी डॉ. किरसान यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पुरामुळे व आजपासच्या नुकसान ग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्याचे स्पष्ट निर्देश दिले.व शेतकऱ्यांच्या बांधावरच जनतेनी निवेदने देऊन मागणी केली.

तसेच शेतमालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी व शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा ठोस पाठपुरावा करणार असल्याचेही आश्वासन दिले.यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जातांना MRGS च्या योजनेमध्ये जी कामे झालीत ती संपूर्ण निकृष्ट दर्जाची असल्या संदर्भात गावाकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या याबरोबरच शेतकऱ्यांना शेतात ये – जा करण्यासाठी पानदन रस्त्याची अवस्था सुद्धा जैसे थेच आहे. अधिकारी याकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष करीत असतात अशिही अवस्था बघावयास मिळाली. चंद्रपूर वर्धा जिल्ह्याच्या सिमेवरील रस्त्यांची कामे अनेक वर्षांपासून रखडली गेली आहे.

तसेच चिमूर हिंगणघाट जाणाऱ्या मार्गाचे काम अनेक वर्षांपासून संत गतीने सुरु आहे. ई पिक पाहणी ऍप वर पिक पेरा चढविण्यासाठी शेतकऱ्यांना नेटवर्क अभावी तारेवरची कसरत करावयास लागत असल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट सानुग्रह अनुदान देण्यात यावा याबाबत मांडणी करणार असेही खासदारणी सांगितले.तर सावरी येथील सरपंच लोकनाथ रामटेके यांनी सावरी ते आमडी जाणाऱ्या मार्गाची अतिशय दैनिय अवस्था असल्याने त्याबाबतचे निवेदन ग्रामपंचायत सावरी याठिकाणी खासदारांना देण्यात आले.
या पाहणी दौऱ्यात चिमूर तहसीलचे तहसीलदार श्रीधर राजमाने, गटविकास अधिकारी फुलझले यांच्यासह तालुक्यातील संबंधित तलाठी, कृषी अधिकारी कामडी,सहाय्यक कृषी अधिकारी शेंडे, ग्राम विकास अधिकारी तसेच काँग्रेस पक्षाचे चिमूर तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष विजय पाटील गावंडे, जिल्हा सरचिटणीस गजानन बुटके, राजेश चौधरी,विजय झाडे, प्रतिक ढोक, बंडू मेश्राम, सुनील गुळघे, विनोद देठे, चंदाताई कारेकार, इरफान पठाण, दत्ताजी देहारे, नंदूजी नागोसे, साहिल कुरेशी, रुपचंद शास्त्रकर, बबन कुबडे, रामाजी शेंडे, तेजराम झाडे, भारत नन्नावरे, विठ्ठल रणदिवे, प्रफुल दरे, उदयभान राऊत, कुणाल रामटेके, गजानन घानोडे, सुभाष काळेकर, टिपलेश्वर निखाडे, प्रशांत कोल्हे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष नागेंद्र चुट्टे, संदीप कावरे, ताहीर शेख,चंदू मडकवार,श्रीकांत गेडाम, अमोल नागोसे यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी व शेतकरी उपस्थित होते.
ज्वाला समाचार सच का सामना