Breaking News

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई अवैध देशी विदेशी दारू व शस्त्र साठा केला जप्त

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- दिनांक २९/०७/२०२५ रोजी पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले हे पोलीस स्टॉफ सह चंद्रपुर शहरात प्रोव्हीबीशन, जुगार रेड, सुगंधित तंबाकु तसेच इतर अवैध धंदयावर कार्यवाही करणे कामी रखाना होवुन पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिर दृवारे खबर मिळाली की, आंबेडकर नगर बाबुपेठ वार्ड चंद्रपुर येथे राहनार इसम नामे श्रीनिवास नरहरी हा आपल्याजवळील स्पीफट चारचाकी वाहनात व स्वतःचे घरी मध्यप्रदेश तसेच महाराष्ट्रातील अवैधरित्या देशी, विदेशी दारू विक्री करिता बाळगुण ठेवला आहे. तेव्हा सदर माहीतीच्या अनुषंगाने धाड टाकुण पंचा समक्ष घर व वाहनाची घरझडती घेतली असता,

मध्यप्रदेश व महाराष्ट्रतील देशी व विदेशी दारूच्या एकुण ४९ पेटया किंमत अंदाजे ४,७६,९२०/- रूपये, दारू विक्रीतुन मिळालेली नगदी रक्कम ९७,०००/-रूपये, दारू वाहतुकी करिता वापरलेले चारचाकी वाहन क्रमांक एम.एच. ३२ वाय ०९२६ किमंत ५,००,०००/-रूपये, एक धारदार लोखडी तलवार किंमत ५००/- रूपये असा एकुण १०,७४,४२०/-रूपयाचा मुद्देमाल मिळुण आला. सदर प्रकरणात आरोपी नामे श्रीनिवास नरहरी याचे विरूदध पोलीस स्टेशन रामनगर येथे अप.क. ६१४/२०२५ कलम ६५ (ई), ८३ महाराष्ट्र दारूबंदी कायदा, सहकलम ४,२५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करूण मुट्टदेमाल पोलीस स्टेशन रामनगर येथे जमा करण्यात आला.

सदरची कारवाई मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा /सुभाष गोहोकार, पोहवा/सतिश अवथरे, पोहवा/रजनिकांत पुठावार, पोहवा / दिपक डोंगरे, पोहवा /इम्प्रनखान, पोअ/किशोर वाकाटे, पोअ/हिरालाल गुप्ता, मपोअ अपर्णा मानकर सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved