Breaking News

विद्यार्थ्यांनी निवडणुकीत अनुभवला मतदानाचा हक्क

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- नेहरू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत मतदान करून मतदानाचा हक्क अनुभवला. नेहरू विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चिमूर येथे विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच मत पत्रिकेद्वारे मतदान प्रक्रिया राबविण्यात आली विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेची जाणीव व्हावी व प्रत्यक्ष मतदानाचा अनुभव यावा या उद्देशाने हा अभिनव उपक्रम यशस्वीपने पार पडला. शालेय निवडणूक निर्णय अधिकारी प्राध्यापक अभिलाष गोमासे यांनी काम सांभाळले.नेहरू विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रिन्सिपॉल निशिकांत मेहरकुरे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेची जाणीव होण्याच्या दृष्टीने ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणली.

शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणुकी करिता निवडणूक निरीक्षक म्हणून चिमूर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार दिवाकर निकुरे यांनी निवडणूक दरम्यान शाळेला भेट दिली, या निवडणूक प्रक्रियेत वर्ग ५ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनी मतदान प्रक्रियेत पहिल्यांदाच सहभाग घेतल्याने मतदानाचा हक्क बजावल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्र प्रमुख मनोहर मिलमिले. मतदान अधिकारी. सुखदेव टीकले. सचिन गायधनी. सुषमा धोपते. शैलेश वाघधरे. सुनील धारणे. भालचंद्र लोढे. राजू दांडेकर. राहुल मस्कर. दीपक श्रीरामें यांनी काम सांभाळले‌.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved