Breaking News

अल्पवयीन मुलीस प्रेमाचे व लग्नाचे आमिष दाखवुन फुस लावून पळवून नेऊन केला लैंगीक अत्याचार

 

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

*नराधम आकाश सोमनाथ गिरम आरोपीस पोलीसांनी 6 तासाचे आत केले शिताफीने अटक*

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव :- दिनांक- 10/06/2025 वार मंगळवार या बाबत सविस्तर वृत्त असे कि शेवगांव पोलीस स्टेशन ला दिनांक दि.०4/०६/ २०२५ रोजी महीला वय ३६ वर्षे रा वडार गल्ली शेवगाव ता शेवगाव जि अहिल्यानगर यांनी शेवगांव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली कि, आरोपी आकाश सोमनाथ गिरम वय 25 रा शहरटाकळी ता. शेवगाव याने फिर्यादीचे अल्पवयीन मुलीस लग्नाचे व प्रेमाचे अमिष दाखवुन दिनांक 01/06/2025 रोजी त्यांचे कायदेशिर रखवालीतुन पळवुन आरोपी काम करीत असलेले हॉटेल जगदंबा भातकुडगाव येथे घेवुन गेला व तेथे पिडीतेस चार दिवस ठेवले, तक्रारदार हे तक्रार देण्यासाठी शेवगाव पोलीस स्टेशन येथे जाणार आहे.

असे आरोपीस समजल्याने आकाश सोमनाथ गिरम रा शहरटाकळी ता. शेवगाव याने पिडीतेला दिनांक 04/06/2025 रोजी दुपारी ०१/०० वा.चे. सुमारास शेवगाव पोलीस स्टेशनच्या आवारात आणून सोडले. अशा फिर्यादीवरुन शेवगांव पोलीस स्टेशनला गुं.र.न. 503/2025 भा.न्या.स. कलम 137(2),87 पोक्सो कायदा कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला व सदर गुन्हयाचा तपास स.पो.नि. धरमसिंग व्ही. सुंदरडे यांचेकडे देण्यात आला होता. पो.नि.समाधान नागरे यांनी सदर गुन्हयातील आरोपीताचा शोध घेवुन त्यास तात्काळ अटक करण्यासाठी स.पो.नि. धरमसिंग व्ही. सुंदरडे यांचे नेतृत्वात तपास पथक नेमले होते. सदर तपास पथकाने आरोपीतास गुन्हा दाखल झाले नंतर 06 तासांचे आत त्याचा गोपनिय माहीतीचे आधारावर शोध घेवुन त्यास शहर टाकळी येथुन ताब्यात घेवुन शेवगांव पोलीस स्टेशनला आणुन अटक केली.

तपास अधिकारी सपोनि सुंदरडे यांनी पिडीत मुलीस विश्वासात घेवुन तिचा जबाब नोंदविला असता पिडीतेने सदर गुन्हयातील आरोपीताने तिचे सोबत मागील 2 महीण्यांपासुन हॉटेल जगदंबा येथे बऱ्याच वेळा प्रेमाचे व लग्णाचे आमिष दाखवून तिचे सोबत लैगिंक सबंध ठेवल्याचे तसेच पिडीतेची वैदयकिय तपासणी करण्यात आलेली असुन आरोपीतास दिनांक 05/06/2025 रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीतास दिनांक 10/06/2025 पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केलेला आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे सो अहिल्यानगर,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे अहिल्यानगर.उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील सो उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.समाधान नागरे, तपास अधिकारी सपोनि धरमसिंग सुंदरडे, पोउपनि/महाले, पाहेकॉ/अरविंद चव्हाण, पोकों/श्याम गुंजाळ, पोकों/आठरे, पोकॉ/कृष्णा मोरे यांनी केली असुन वरिल गुन्ह्यांचा तपास सपोनि धरमसिंग सुंदरडे हे करत आहेत.

*ताजा कलम*

*एक वर्षापुर्वी पिडीतेच्या आईवडीलांनी पिडीतेचे लग्ग्ण धुळे येथील एका मुलासोबत लावुन दिले असल्याचे पिडीतेने पोलीसांना दिलेल्या जबाबात सांगीतल्याने सदर गुन्हयात अल्पवयीन पिडीतेचे जबाबावरुन सदर गुन्हयात वाढीव कलम भा.न्या.स. कलम 64 (2) (आय) (एम), 65(1) तसेच पोक्सो कलम 4.5(L).6.8 तसेच बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006, कलम 10,11 प्रमाणे समाविष्ठ करण्यात आलेले असुन पिडीतेचे आई वडील सासु सासरे तसेच पती यांना देखील आरोपी बनविण्यात आलेले आहे. त्यामुळे पीडित मुलीचे कुटुंबीयही आरोपी झाले आहेत*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved