jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
* अजूनही तालुक्यात अवैधरित्या रेतीची वाहतूक सुरुच *
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रेती माफियांचा धुमाकूळ सुरु असून महसूल पथक ऍक्शन मोडवर आली असल्यामुळे दिनांक.२९ एप्रिल २०२५ ला रात्री १२ ते १ वाजे दरम्यान १ ट्रॅक्टर सोनेगाव सिरास ते चिमूर मार्गावर अवैधरित्या रेतीची वाहतूक करीत असतांना पकडले तर ३ ट्रॅक्टर उपजिल्हा रुग्णालय समोरील पाणी फिल्टर जवळील उमा नदी पात्रातून रेती भरत असतांना महसूल पथकाने पकडली असून चारही ट्रॅक्टर चिमूर तहसीलला जप्तीची कारवाई करण्यात आली.
हि कारवाई तलाठी मेहरकुरे, चिडे, घोडघासे, मुंदे,पाटील व अन्य कर्मचारी यांनी मिळून केली असता सुद्धा रेती माफियामध्ये कसल्याही प्रकारचे भीतीचे वातावरण पसरल्याचे चित्र दिसून येत नसून सर्रास बिनधास्तपणे अजूनही रेतीची तस्करी आणि वाहतूक तालुक्यात सुरुच असल्याचे दिसून येत आहे.या माफियांना आशीर्वाद तरी कुणाचे अशी जनतेत मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे.
” लवकरच ट्रॅक्टर मालकांचे व ट्रॅक्टर चालकांचे नाव कळणार त्याकरिता बघत रहा, वाचत रहा न्यूज ज्वाला समाचार “
ज्वाला समाचार सच का सामना