jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
पोलीस स्टेशन चिमूर हद्दीत अवैध देशी-विदेशी दारूची वाहतुक
वाहनासह दारूच्या ५३० पेटया जप्त
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर/चिमूर :- सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली मोठी कारवाई,४६,९३,८००/- रुपयाचा वाहनासह अवैध देशी विदेशी दारू मुद्देमालासह केला जप्त.
आज दिनांक ०१/०५/२०२५ रोजी एक आयशर ट्रक चंद्रपूर जिल्हयाचे हददीतुन अवैधरित्या देशी-विदेशी दारुची वाहतूक गडचिरोली जिल्हयात करणार आहे अशा खात्रीशिर माहिती वरुन स्थानिक गुन्हे शाखा येथील पथके तयार पोलीस स्टेशन चिमूर हददीत मौजा बंदर शिवापुर परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ या रोडवर प्राप्त पेनुसार आयशर ट्रक कं. CG08-AJ-9948 यास थांबवून विचारपूस केली असता वाहन चालक नामे विशाल देव उइके, वय २७ वर्ष, रा. पाथरी, ता. साकोली, जि. भंडारा व त्याचे साथीदार (२) पप्पु परसराम वाघाडे, वय ई, रा. बोदरा, ता. साकोली, जि. भंडारा आणि (३) सुरेश बंडुजी युवनाते, वय ५० वर्ष, रा. नारी रोड, टेकानाका, लनगर, नागपूर असे असल्याचे सांगितले. सदर वाहनाची झडती घेतली असता त्यात अवैध रित्या देशी-विदेशी पवुन वाहतुक करण्यासाठी पिवळया रंगाचे प्लास्टिक बोऱ्यामध्ये सोयाबीन वडया तसेच भांडे घासणीचे बॉक्स आले.

त्यापलीकडे लाकडी फळया लावुन कप्पा तयार केल्याचे दिसुन आले असुन त्यामध्ये रॉकेट देशीदारू ML एकुण पेटया ३५०, किं. १२,२५,०००/- रु., रॉयल स्ट्रॉग कंपनीची विदेशी दारू 180 ML एकुण ९० किं. ११,२३,२००/- रु. तसेच हॉवर्ड 5000 बियर एकुण ९० पेटया किं. ३,४५,६००/- रु. व आयशर ट्रक कं. -AJ-9948 किं. २०,००,०००/- रु. असा एकुण ४६,९३,८००/- रुपयांचा मुद्देमाल मिळुन आल्याने राज्य न शुल्क विभाग, चिमुर उपविभाग चंद्रपूर यांचेकडुन रॉकेट देशी दारू संत्रा 90 ML एकुण पेटया ३५० या वरी पाहणी अहवाल घेतला असता सदर रॉकेट देशी दारू संत्रा ३५० पेटया या बनावट दारु असल्याचे न्न झाले आहे.

यावरून नमुद वाहन चालक (१) विशाल कमलदेव उइके व त्याचे साथीदार नामे (२) पप्पु परसराम वाघाडे गुरेश बंडुजी युवनाते (४) विशाल जांभुळकर यांचेविरुध्द पोलीस स्टेशन चिमूर येथे गुन्हा नोंद करण्यात आली.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर व राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर यांचे उपस्थितीत करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्रीमती रिना जनबंधु अपर पोलीस एक चंद्रपूर अमोल काचोरे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतृत्वात सपोपि दिपक प्रवार, सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि संतोष निंभोरकर, सफौ स्वामीदास चालेकर, पोहवा गणेश पोहवा नितीन साळवे, जयंता चुनारकर, जयसिंग, प्रकाश बल्की, संजय वाढई, नितीन कुरेकार, अजय र, नापोअं संतोष येलपुलवार, पोअं गणेश भोयर, गोपीनाथ नरोटे, गोपाल अतकुलवार, प्रदिप मडावी, प्रसाद डे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.
ज्वाला समाचार सच का सामना