Jwalasamachar .Jwalasamachar .Jwalasamachar .Jwalasamachar
Jwalasamachar .Jwalasamachar .Jwalasamachar .Jwalasamachar
अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे कि दिनांक 29 एप्रिल 2025 मंगळवार रोजी सर्व पक्षीय कृती समिती यांचे शेवगाव नगरपरिषद हद्दीतील मुलभूत प्रश्नासंदर्भात नगरपरिषद प्रशासनाच्या उदासीनते च्या विरोधात दि.०५ मे २०२५ वार सोमवार रोजी खालील विषयांन्वये आम्ही सर्व पक्षीय शेवगाव कृती समितीच्या वतीने निवेदन सादर करतो की, शेवगाव शहरातील पाणी प्रश्नाबाबद नवीन योजने संदर्भात नगरपरिषदेमध्ये संबधित एजन्सी, तांत्रिक सल्लागार, व प्रशासक यांच्या समवेत झालेल्या बैठकी दरम्यान सदर नवीन पाणी योजने कामा बाबत विसंगतता दिसून येत आली असताना आपण त्या संदर्भात झालेल्या चर्चे अंती ठरल्या प्रमाणे पाणी साठवण टाकी क्षमते बाबत, वाल संखे बाबत, पाईप व कनेक्शन तसेच काही शहरातील भाग वगळण्यात आला याबाबत आपण सर्व जनतेसमोर पंधरा दिवसात ठेवणार होते व पूर्ण माहिती सह हजर न होता आपण व संबधित एजन्सी व तांत्रिक सल्लागार हे मनमानी पद्धतीने काम करत आहेत.
२.शेवगाव शहरातील सर्व राज्यमार्गावरील अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपरिषद यांनी काढण्याचे काम केले परंतु त्याचा पडलेला रोडा व राडा रोडा गटारीवर पडून सर्व गटारी बंद झाल्या असून धुळीचे साम्राज्य वाढलेले असून शेवगाव शहरातील नागरिकांना त्याचा धोका निर्माण झालेला आहे. तसेच रस्ताच्या शासकीय नियामनुसार ह ‘खुणा निश्चित करून३. शहरातील जमा केलेल्या कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंडवर प्रोसेसिंग न करता आहे तसा कचरा उचलून दुसरीकडे पसार करण्यात येऊन ठेकेदारास बिल अदा करण्यात आले आहे असे समजते. तसेच शहरातील नालीसफाई, घंटागाडी, लाईट, फवारणी या आरोग्याच्या विषयाकडे नगरपरिषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.
४. नगरपरिषदेने लावलेले घरपट्टी व पाणीपट्टीवर आकारण्यात येणारे व्याज माफ करावे.
वरील सर्व कामाची तात्काळ चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अन्यथा दि. ०५/ ०५/ २०२५ या तारखेला सर्व पक्षीय कृतीसमिती नागरीका समवेत क्रांतीचौक शेवगाव येथे रस्तारोको आंदोलन करण्यात येईल याची सर्व जबाबदारी शासनाची राहील. असे निवेदन दिले त्याच्या प्रति
१. मा.ना. राधाकृष्ण विखे पालकमंत्री महाराष्ट्र शासन
२. मा.खा. निलेशजी लंके साहेब
३. मा. आ. मोनिकाताई राजळे
४. मा. जिल्हाधिकारी साहेब अहिल्यानगर
५. मा. जिल्हाधिकारी नगरविकास विकास अहिल्यानगर
६. मा. उप विभागीय अधिकारी शेवगाव / पाथर्डी
७. मा. मुख्याधिकारी नगरपरिषद शेवगाव
८. मा. उप-अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शेवगाव
९. मा. पोलीस निरीक्षक साहेब शेवगाव
*ताजा कलम*
*तहसीलदार शेवगांव यांनी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीला संबंधित पाणी येजनेच्या ठेकेदार कंपनी स्वस्तिक इंडिस्ट्रीज कोल्हापूर तांत्रीक सल्लगार कंपनी मानवसेवा कंपनी धुळे आणि नगरपरिषद शेवगांव चे प्रशासक मुख्याधिकारी अथवा पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी गैरहजर राहिल्याने सर्वपक्षीय कृतीसमिती सोमवारी 05 मे ला आंदोलन करण्यावर ठाम आहे*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*
ज्वाला समाचार सच का सामना