jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
वृक्षलागवडीचा खर्च पाण्यात
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- महाराष्ट्र राज्यात वन आच्छादन वाढण्यासाठी व महाराष्ट्र हिरवं कंच राहण्यासाठी करोडो रुपये खर्च करून ३३ कोटी वृक्षलागवड राबविण्यात आली.अशातच सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन पिसे पेट्रोल पंप ते सार्वजनिक बांधकाम विभागापर्यत वृक्ष लागवड करण्यात आली. पण पाण्याअभावी झाडे वाळून गेल्याने वृक्षसंवर्धनावर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित होत आहे.
ऐन उन्हाळ्यात दुभाजकामध्ये ठेकेदाराने वृक्षलागवड करुन पाणी न दिल्यामुळे झाडे अखेरचा श्वास घेत आहे. वृक्ष लागवड पावसाळ्यात केली जाते पण ऐन रखरखीत उन्हात झाडांची लागवड केल्याने लाखो रूपयांचा निधी वाया गेला. अनेकदा चिमुरात दुभाजकावर दोन – तिन वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाने वृक्षारोपण केले पण विभागाने लक्ष न दिल्याने वृक्षलागवडीचा बोजवारा उडाला.लाखो रूपयांचा शासनाच्या निधीवर पाणी फेरले.वृक्ष लागवड करतात पण जगवण्याची जबाबदारी घेत नसल्याने वृक्षलागवडीचा खर्च वाया जातो.
ज्वाला समाचार सच का सामना