Breaking News

नागपूर विभागात दोन वाजेपर्यंत 32.92 टक्के मतदान

नागपूर, दि. 1 : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आज मतदानाच्या दिवशी विभागातील 322 मतदान केंद्रावर सकाळी 12 ते 2 दरम्यान 32.92 टक्के मतदान झाल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.

दुपारी 2 वाजेपर्यंत झालेल्या मतदानामध्ये 35.15 टक्के पुरुषांनी तर 29.49 टक्के महिला पदवीधर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्हानिहाय झालेले मतदान नागपूर 28.54 टक्के, भंडारा-37.69 टक्के, चंद्रपूर-36.89 टक्के, गोंदिया-33.03 टक्के, गडचिरोली-40.54 टक्के, वर्धा-38.84 टक्के

सकाळी 8 ला आज विभागात मतदानाला सुरुवात झाली. नव मतदारांमध्ये मतदानाची उत्सुकता दिसून आली. कोविड सुरक्षा नियमांचे पालन करून ही निवडणूक होत आहे. मतदानाची वेळ सकाळी 8 ते 5 आहे. विभागात 2 लाख 6 हजार 454 मतदार आहेत.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

दीक्षाभूमी भूमिगत पार्किंगला स्थगिती

नागपूर :- दीक्षाभूमी येथे विकासाचा आराखडा तयार करण्यात आला. त्यासाठी राज्य सरकारने 200 कोटी रुपये …

पारडी येथील प्रस्तावित बाजारपेठेची मनपा आयुक्तांनी केली पाहणी

नागपूर – नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (२७ जून) पारडी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved