Breaking News

दिव्यांग संशोधन समिती व राज्य सल्लागार मंडळ पुनर्गठनासाठी 28 ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव आमंत्रित

नागपूर, दि.26 : दिव्यांग व्यक्ती हक्क कायद्यानुसार दिव्यांगाबाबतचे राज्य सल्लागार मंडळ व दिव्यांग संशोधन समितीचे पुनर्गठन करण्यात येणार आहे. त्यासाठी दिव्यांग कल्याण क्षेत्रात कार्यरत नामवंत व तज्ञ व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती व दिव्यांगाच्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीत्व करणारे दिव्यांग पदाधिकारी व सदस्य यांच्या नियुक्तीसाठी 28 ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी अनिल किटे यांनी केले आहे.

राज्य सल्लागार मंडळ व दिव्यांग संशोधन समितीवर नियुक्तीकरीता प्रस्ताव सदस्यांची नावे, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक तसेच संक्षिप्त थोडक्यात वैयक्तिक माहिती व उल्लेखनीय कामगिरीची माहितीसह तीन प्रतीमध्ये जिल्हा समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, नागपूर कार्यालयात स्वीकारण्यात येतील.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

दीक्षाभूमी भूमिगत पार्किंगला स्थगिती

नागपूर :- दीक्षाभूमी येथे विकासाचा आराखडा तयार करण्यात आला. त्यासाठी राज्य सरकारने 200 कोटी रुपये …

पारडी येथील प्रस्तावित बाजारपेठेची मनपा आयुक्तांनी केली पाहणी

नागपूर – नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (२७ जून) पारडी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved