Breaking News

पोक्सो कायदा तथा बालविवाह प्रतिबंधाबाबत मागदर्शन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

* जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या वतीने आयोजन *

* शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या वतीने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या मार्गदर्शनात बीजीएम कार्मेल अकादमी येथे मंगळवारी पोक्सो कायदा तथा बालविवाह प्रतिबंध आणि महिला बालविकास विभागाच्या योजनांवर मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मुख्य न्यायदंडाधिकारी प्रशांत कुलकर्णी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुधीर इंगळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे, उपशिक्षणाधिकारी गणेश येरणे, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा क्षमा बारसकर, सदस्या ज्योत्स्ना मोहितकर, वनिता घुमे, बीजीएम कार्मेल अकादमीचे प्राचार्य जेसन जेकब, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी पुलकित सिंह म्हणाले, बालक देशाची संपत्ती असून बालकाचे संरक्षण आपली प्रथम जबाबदारी आहे. बालकांच्या संरक्षणासाठी शासन प्रशासन तसेच समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपली भूमिका संवेदनशीलपणे पार पाडावी, असे आवाहन केले. मुख्य न्यायदंडाधिकारी प्रशांत कुलकर्णी, यांनी मार्गदर्शन करतांना, बालकांची सुरक्षितता ही अत्यंत महत्वाची असून सर्वांनी कायद्याला अनुसरून कार्यवाही केलीच पाहिजे. यासाठी जिल्हा महिला व बालविकास कार्यालय व पोलिस यांना सहकार्य करावे. सुधीर इंगळे यांनी बालविवाह व पोक्सो कायदा समजावून सांगितला व बालविवाह प्रतिबंध अधिकारी यांच्या जबाबदारीविषयी मार्गदर्शन केले. तसेच ग्राम/वार्ड बाल संरक्षण समितीची भूमिका विषद केली.

प्रास्ताविकातून मिनाक्षी भस्मे यांनी, बालकांच्या कार्यक्षेत्रात कार्य करणारे अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी सदर कार्यशाळा महत्वाची असून सर्व संबंधित यंत्रणेने समन्वयाने कार्य करून चंद्रपूर जिल्हा बालविवाह मुक्त तसेच बालस्नेही बनविण्याचा संकल्प करू या असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन कल्पना राजुरकर यांनी तर आभार अजय साखरकर यांनी मानले. यावेळी विधी अधिकारी अनिल तानले, परिविक्षा अधिकारी अतिशकुमार चव्हाण, अभिषेक मोहुर्ले, शशिकांत मोकाशे, जिल्हा व रेल्वे चाईल्ड हेल्पलाईन, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सखी वन स्टॉप सेंटर, रूद्या संस्था आदींनी मोलाची भुमिका बजावली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ग्रामपंचायत कार्यालय मोहाळी (नलेश्वर) च्या कोंडवाड्याच्या जागेवर अतिक्रमण

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

नागरिकांनी महाराजस्व अभियानाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved