Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
* अपघातात दोघांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी *
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – आज दिनांक. १८/०३/२०२६ ला सकाळी ०९:४५ वाजताच्या सुमारास चिमूर शहरातील नेहरू चौक येथील हनुमान मंदिरा लगत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वर नगर परिषद चिमूर येथील घणकचरा वाहतूक करणारा ट्रॅक्टर रोड दुभाजकाला लागून उभा केला असता मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रिपलसीट दुचाकी ने जबर धडक दिली. यात दुचाकी चालक नामे प्रथमेश मनोहर मेश्राम वय-24 वर्ष राहणार नेताजी वार्ड चिमूर याचा उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे मृत्यू झाला.

दोघांना नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्यातील नामे प्रशांत अभिमन शंभरकर वय 39 वर्ष राहणार कवडशी (रोडी) ता.चिमूर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तिसरा व्यक्ती नामे उत्तम रंगाराव रामटेके वय 50 वर्ष राहणार कवडशी (रोडी) ता. चिमूर हा गंभीर जखमी आहे.

पोलिसांनी ट्रॅक्टर चालक नामें उस्मान खाँ छोटु खाँ पठाण वय-60 वर्ष राहणार नेताजी वार्ड चिमूर असे यास चौकशी साठी ताब्यात घेतले असून ट्रॅक्टर मुंडा वाहन क्रमांक -MH-40-L-5509 महेंद्रा 595 DI सरपंच कंपणी चा मुंडा तर ट्रॉली वाहण क्र. MH-34-BV-7365 श्रीकृष्ण ट्रेलर कंपणीची ट्रॉली व मोटार सायकल वाहण क्र. MH-34-AW-8587 फॅशन प्रो कंपनी अशी दोन्ही वाहनांना चिमूर पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात चिमूर पोलीस करीत आहे.
ज्वाला समाचार सच का सामना