Breaking News

चिमूर नगरीत सतगुरु रविदास जयंती कार्यक्रमाचे आयोजन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

 

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- चर्मकार समाज संघटना चिमूरच्या वतीने दिनांक 7 व 8 फेब्रुवारी रोजी चर्मकार समाज सभागृहात सतगुरु रविदास जयंती व मुर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सकाळी परिसर स्वच्छता झाल्यानंतर 7 वाजता घटस्थापना करण्यात येईल. यावेळी विजय विरूळकर, सुभाष कानझोडे विकास नवले, धनंजय नवले, विस्वास कानझोडे, झिंगू येरेकर यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दुपारी 12 वाजता रांगोळी स्पर्धा व सायंकाळी 5 वाजेपर्यंत हळदी कुंकु कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सदगुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेची चिमूर शहरात भव्य मिरवणुक काढण्यात येणार आहे. या मिरणुकीचे नियोजन विक्की नंदरे, राजु नवले, सुरज वाकडे, सुरेश शिंगाडे, श्रेयश नंदारे, राहुल नवले, राकेश नवले, वैभव नवले, पवन इंगोले, रूपम नवले, कवडु कानझोडे, परसराम नंदरे, गजानन इंगोले, मनोज नवले, अमोल नवले, प्रकाश शिंगाडे, गोवर्धन नवले, प्रविन वाकडे, मिथुन इंगोले, ऋषभ इंगोले, अंकित नवले, सचिन नवले, शुभम शिंगाडे, साहिल नवले, अजय शिंगाडे, गोपाल डहाके, सुहास कानझोडे, प्रमोद अंडेलकर, कुणाल ढाक, मंथन नवले, प्रशांत नवले, विशाल शिंगाडे, तुषार सिंगनजुळे, आदी कार्यकर्ता गण नियोजन करीत आहेत. दुपारी 12 वाजता सुरेश महाराज सोनटक्के यांचे किर्तन झाल्यानंतर दुपारी 3 वाजता सदगुरु रविदास महाराज यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल.

प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाला आमदार बंटी भांगडिया, चिमूरच्या नगराध्यक्ष गिता लिंगायत, उप नगराध्यक्ष संजय नवघडे, नगर सेवक कविता बानकर, प्रशांत तळवेकर, सामाजिक कार्यकर्ते समिर राचलवार, आयुष कामडी, कमलकिशोर असावा, आदि मान्यवर उपस्थित राहणार आहे.
कार्यक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन चर्मकार समाज संघटनेचे अध्यक्ष नाना शिंगाडे सचिव चंद्रशेखर नवले,सुनील ढाक, धनंजय नवले, नंदू इंगोले, उत्तम नवले, यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

एसआयआर अंतर्गत 100 टक्के घरोघरी जाऊन होणार मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved