Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर नगर परिषदेच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात नवनियुक्त नगराध्यक्ष तथा नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा नुकताच संपन झाला. नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी नवनियुक्त नगराध्यक्षांना नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर गीता लिंगायत यांना विराजमान केले.यावेळेस मंचावर आमदार कीर्तीकुमार भांगडीया नवनियुक्त नगराध्यक्षा गिता लिंगायत,माजी राज्यमंत्री रमेशकुमार गजभे, नव नियुक्त उपाध्यक्ष संजय नवघडे, मुख्याधिकारी अर्चना वंजारी,डॉ दिपक यावले, निलम राचलवार ,डॉ.नरेंद्र यावले, डॉ.दिलिप शिवरकर, गजानण गुडधे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक इत्यादीसह मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांनी बोलताना सांडपाणी प्रक्रिया केंद्रा करीता दोनशे पन्नास कोटी रुपये लवकरच मिळणार आहेत. सर्वच नगर सेवकांनी हेवे दावे न करता गुण्यागोविद्याने करून चिमूर नगर परिषदेचा विकास करावा यावेळेस पदग्रहण करताना सगळ्यांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही दिली.या कार्यक्रमा पुर्वी उपाध्यक्ष निवडण्याकरीता नवनियुक्त सदस्यांची सभा पार पडली. ज्यात भाजपा नगसेवक गट नेते संजय नवघडे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यानंतर उप विभागीय अधिकारी किशोर घाडगे यांच्या उपस्थितीत नामनिर्देशीत सदस्य म्हणून श्रेयश लाखे तथा सचिन फरकाडे यांची घोषणा करण्यात आली.सर्व नगरसेवकांचे सत्कार करण्यात आले. याप्रसंगी आमदार कीर्तीकुमार भांगडिया सह नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी सन्मानपूर्वक नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर गिता लिंगायत यांना विराजमान केले.
ज्वाला समाचार सच का सामना