Breaking News

नेहरू विद्यालय व उच्च महाविद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

* संगम २०२५/२०२६ कार्यक्रम *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर/चिमूर :- नेहरू विद्यालय व उच्च महाविद्यालय, चिमूर येथे संगम २०२५–२०२६ या नावाने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आज दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी शाळेच्या भव्य पटांगणात अत्यंत उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निशिकांत मेहरकुरे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सतिश मेश्राम यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.कार्यक्रमाचे प्रभावी व सूत्रबद्ध संचालन विलास गोमासे यांनी केले.स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम,नृत्य,़गीत,नाट्यप्रयोग आदींचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व व्यासपीठावरील आत्मविश्वासाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

अध्यक्षीय भाषणात निशिकांत मेहरकुरे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व विशद केले. तर प्रमुख पाहुणे सतिश मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच संस्कार, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी किरण उमरे मॅडम यांनी आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद, विद्यार्थी व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

26 जुन पासुन शाळा सुरू करा – कवडू लोहकरे यांची मागणी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved