Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- नागभिड तालुक्यातील ३६ वर्षीय इसमाने सावकाराकडुन व्याजाने घेतलेल्या पैश्याची परतफेड करण्याकरीता वेगवेगळया सावकारांकडुन व्याजाने पैसे घेवुन मोठया प्रमाणावर सावकारांना व्याजाची रक्कम दिल्यासंदर्भात केलेल्या तक्रारीवरुन पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे दाखल अपराध क्रमांक ६५४/२०२५ कलम ३८७, ३४२, २९४, ५०६, १२० (ब), ३२६ भादंवि आणि कलम ३९, ४४ महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ या गुन्हयाचे गांर्भीय पाहता सदर गुन्हयाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले असुन तपासात, फिर्यादी यांची किडनी प्रत्यार्पण संबंधाने सदर गुन्हयात कलम १८, १९ The Transplantation of Human Organs and Tissues Act, 1994 चे समाविष्ठ करण्यात आले आहे.
फिर्यादी यांनी किडनी प्रत्यार्पण संदर्भात दिलेल्या माहितीवरुन सखोल तांत्रिक तपास करुन फिर्यादीने ज्या इसमामार्फत कंबोडिया जावुन किडनी प्रत्यार्पित केली होती त्या इसमाचा नांव, पत्ता निष्पन्न करुन विशेष तपास पथकाची एक टिम सोलापुर येथे पाठवुन एका ३५ वर्षीय आरोपी इसमास ताब्यात घेवुन त्याचे सखोल विचारपुस केली असता सदर आरोपी याने स्वतः ला डॉक्टर असल्याचे भासवून फिर्यादी यांची किडनी कंबोडिया या देशात (Preah Ket Mealea Hospital, Phnom Penh, Cambodia) येथे प्रत्यार्पित केल्याचे सांगत असुन त्यास सदर कामाचे कमिशन स्वरुपात रक्कम मिळत असल्याचे सांगत आहे. तरी सदर आरोपी याने यातील फिर्यादी शिवाय अजुन किती लोकांना अशा प्रकारे स्वतःला डॉक्टर भासवून किडनी प्रत्यार्पित करण्यासाठी इतर देशात नेले याबाबत सखोल तपास सुरु आहे.
ज्वाला समाचार सच का सामना