Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
विशेष प्रतिनिधी – नागपूर
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार ता.२३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. येत्या १५ जानेवारीला नागपुरात मतदान होणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, येत्या मंगळवार ३० डिसेंबरपर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशाने महानगरपालिकेच्या १० झोन कार्यालयांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
शहरातील ३८ प्रभाग १० झोनमध्ये विभागण्यात आले आहेत. झोनमध्ये येत असलेल्या संबंधित प्रभागातील इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. महानगरपालिकेतील ३८ प्रभागातील एकूण १५१ जागांपैकी ७६ जागा महिलांसाठी राखीव आहेत. यात अनुसूचित जातीच्या महिलांसाठी १५, अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ६, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी २० तर खुल्या प्रभागातील ३५ जागा महिलांसाठी राखीव झालेल्या आहेत.
नागपूर महानगरपालिकेत अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी ३० जागा राखीव आहेत. त्यापैकी १५ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमातीसाठी एकूण १२ जागा राखीव आहेत. त्यापैकी ६ जागा महिलांसाठी राखीव आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण ४० जागा राखीव आहेत. त्यापैकी २० जागा महिलांसाठी राखीव आहेत. उर्वरित ६९ खुल्या मतदारसंघातील जागांपैकी ३५ जागा महिलांसाठी राखीव आहेत.उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी येत्या 31 डिसेंबरला करण्यात येईल. अर्ज मागे घेण्याची मुदत 2 जानेवारी २०२६ असून, येत्या ३ जानेवारीला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल तसेच उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. येत्या १५ जानेवारीला मतदान झाल्यानंतर येत्या १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.
” महत्वाच्या तारखा “
· नामनिर्देशनपत्र स्वीकारणे- 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025
· नामनिर्देशनपत्रांची छाननी – 31 डिसेंबर 2025
· उमेदवारी माघारीची अंतिम मुदत- 02 जानेवारी 2026
· निवडणूक चिन्ह वाटप- 03 जानेवारी 2026
· अंतिम उमेदवारांची यादी- 03 जानेवारी 2026
· मतदानाचा दिनांक- 15 जानेवारी 2026
· मतमोजणीचा दिनांक- 16 जानेवारी 2026
ज्वाला समाचार सच का सामना