Breaking News

आम्रवन दिक्षाभूमी सुगतकुटी येथे,”भव्य धम्म परिषद व भिख्यूंची धम्मदेशना १६ व १७ डिसेंबरला संपन्न होणार

 

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- आम्रवन दिक्षाभूमी सुगतकुटी भिख्यूसंघ संस्था मालेवाडा,बौध्द पंच कमेटी तथा भिमज्योती महिला मंडळ मालेवाडा यांचे संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा मालेवाडा येथील,”आम्रवन दिक्षाभूमी सुगतकुटी येथे भव्य धम्म परिषदचे आयोजन करण्यात आले आहे.याचबरोबर भिख्यूंच्या धम्मदेशनेचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
सदर कार्यक्रमाची रूपरेषा दोन दिवसीय असून १६ व १७ डिसेंबरला धम्मदेशनेचा कार्यक्रम पार पडणार आहे.तद्ववच १७ डिसेंबरला मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे.

“किच्छो मनुरस पटिलाभो किच्छं मच्चानं जीवितं किच्छं सध्दम्म सवणं किच्छो बु‌द्धानं उप्पादो॥

सुधारित माणसाचा जन्म प्राप्त होणे दुर्मिळ आहे.दुर्मिळ आहे माणसाचे दिर्घकाळ जिवीत रहाणे,त्याही पेक्षा दुर्मिळ आहे सद्धम्म मिळणे,त्याही पेक्षा दुर्मिळ आहे बुद्धाचा जन्म होणे.दान देणे पुण्याकारक आहे.धम्मदाणाची तुलना कोणत्याही अन्य दानात केल्या जात नाही.(नववा शिलालेख अशोक सम्राट)अडीच हजार वर्षे झाली,प्रथम बुध्द शासन संघले आणि व्दितीय बुध्द शासनाची पहाट झाली.या धम्ममय पहाटेला डॉ.बाबासाहेबांनी भारतात निर्माण होऊन नष्ट पावलेल्या धम्माचे १४ ऑक्टोंबर १९५६ ला धम्मदिक्षा घेऊन पुर्नज्जीवन केले व या व्दितीय बुध्द शासनाचे आनंदाचे स्वागत केले.

तेव्हापासुन हजारों वर्षे निपरिचीत पडुन राहीलेला हा धम्मध्वज पुन्हा फडकला आणि हजार वर्षानंतर पुन्हा या वायु मंडळात धम्मतरंग प्रस्थापित झाले.भिक्षु धम्माचाप्रचार करु लागेल.आज ६८ वर्षे होऊन गेली,आपण हा धम्म जगत आहोत.डॉ.बाबासाहेबांना अपेक्षित नसलेल्या इतर महायान बौध्द राष्ट्रातील परंपरांचा महाराष्ट्रत झालेला शिरकाव व महाराष्ट्रात धम्माविषयी आसणाऱ्या वेगवेगळ्या विचारधारा यामुळे बौध्द जनतेत धम्मविषयी एक वैचारिक वादळ निर्माण झाले आहे.तेव्हा पुन्हा एकदा भिक्खुसंघाने समरत जनतेला आवाज दिला आहे.चला! एकत्र या,धम्म श्रवणासाठी हिच सुयोग्य वेळ आहे.या करीता आम्रवन दिक्षाभुमी सुगतकुटी मालेवाडा,ता.चिमूर,जि.चंद्रपुर येथे दिनांक १६ व १७ डिसेंबर २०२५ रोजी कार्यक्रम आयोजित केले आहेत.या करीता आपण सहकुटुंब सहपरिवार कार्यक्रमात सहभागी होऊन सर्वतोपरी सहकार्य करावे असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ग्रामपंचायत कार्यालय मोहाळी (नलेश्वर) च्या कोंडवाड्याच्या जागेवर अतिक्रमण

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

नागरिकांनी महाराजस्व अभियानाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved