Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar.in
* दिल्ली महाराष्ट्र सदन मध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते होणार सन्मानित *
विशेष प्रतिनिधी – नागपूर
नागपूर : – ग्रामीण विकास आणि समाजहितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते तसेच नागपूर ग्रामीण तालुक्यातील ग्रामपंचायत कापसी (खुर्द) चे उपसरपंच अक्षय गोकुलप्रसाद रामटेके यांची ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड 2025’ या मानाच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ही माहिती नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड्सच्या केंद्रीय समितीकडून निवडपत्राद्वारे जाहीर करण्यात आली.
भारतामध्ये ग्रामीण विकास, सामाजिक न्याय आणि रचनात्मक उपक्रम राबविणाऱ्या उत्कृष्ट कार्यकर्त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. पुरस्कार वितरण समारंभ 26 नोव्हेंबर 2025 रोजी सायं. 4.00 ते 6.00 वाजता नवी दिल्ली येथील न्यू महाराष्ट्र सदनातील बॅन्क्वेट हॉलमध्ये संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.रामदास आठवले – केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री भारत सरकार , डॉ. अनिल बोन्डे – राज्यसभा खासदार, डॉ. मनीष गवई तसेच या कार्यक्रमाला राष्ट्रीय प्रधान मुखीया सरपंच संघ, नवी दिल्ली यांच्या प्रमुख उपस्थितीमधून आयोजित करण्यात येत असून, ठाकूर चंदन सिंह (बिहार), राष्ट्रीय अध्यक्ष, राहुल उके (महाराष्ट्र), राष्ट्रीय उपाध्यक्ष, प्रमोद पांडुरंग सागोंले, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र हे मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत.
अक्षय रामटेके यांच्या या निवडीमुळे नागपूर जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात आनंद व्यक्त होत असून, ग्रामीण स्तरावर समाज लोककल्याण व बांधकामात्मक उपक्रम राबविण्यात त्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय असल्याचे समितीने नमूद केले आहे.
तज्ज्ञांच्या मते, “स्थानिक स्वराज्य संस्थेतून राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य करण्याचा प्रेरणादायी आदर्श मा. अक्षय रामटेके यांनी निर्माण केला असून त्यांच्या कार्याला मिळालेला हा सन्मान इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल,” असे मत व्यक्त करण्यात आले.
ज्वाला समाचार सच का सामना