Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar.in
* लोखंडी पोल, वाहनाचे लोखंडी पार्ट, गॅस कटर सिलेंडर व पिकअप वाहन ताब्यात *
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- आज दिनांक 21/11/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बल्लारपूर – चंद्रपूर महामार्गावर अवैधरित्या लोखंडी भंगार चोरी करून वाहतूक करीत असतांना 6 आरोपी सहित पिकअप वाहन क्रमांक MH34 BZ8653 सापळा रचून ताब्यात घेतले असून पिकअप क्र. MH 34BZ8653 किंमत 5,00,000, लोखंडी भंगार 2500 किलो किंमत 2,50,000, गॅस कटर सिलेंडर 3 नग किंमत 30,000, घरगुती सिलेंडर असा एकूण 7,82,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे कलम 124 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. या कारवाईत दुर्गेश तुळशीराम भागडे,21 वर्ष, रोशन उमेश भोयर,21 वर्ष, कृष्णा संजय गदइकर,19 वर्ष, अशोक बनेश झाडे,41 वर्ष, दिवाकर तुळशीराम भागडे, साबीर शेख सर्व आरोपी राहणार चंद्रपूर येथील असून पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढिल कार्यवाही PSI संतोष निंभोरकर, PSI सुनील गौरकर. ASI धनराज करकाडे HC गणेश भोयर, संतोष येलपुलवार, PC सुमित बरडे, प्रफुल गारघाटे , स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली.
ज्वाला समाचार सच का सामना