Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar.in
* पोलीसांनी २,१२,५००/- रूपयाचा अवैधरित्या माल पकडला *
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- आज दिनांक 13/ 11/2025 रोजी चिमूर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीचे आधारावर चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत मालेवाडा व पिपर्डा अश्या दोन ठिकाणी अवैधरित्या मोहादारू हातभटटीवर धाड टाकली असता १५ मोठे प्लास्टीक ड्रम मध्ये ७५० किलो मोहासडवा किंमत १८७५०० रूपये , ६ प्लास्टीक कॅन मध्ये ६० लिटर मोहादारू किंमत १८०००रूपये व इतर साहीत्य ७००० रूपयाचा २,१२,५००/- रूपयाचा माल अवैधरित्या पोलीसांना मिळुन आल्याने घटनास्थळावर नष्ट करण्यात आला.

तसेच अवैधरित्या सटटा पटटी जुगारवर कार्यवाही करून सदर आरोपी विरुध्द पो. स्टे. चिमुर येथे दारुबंदी व जुगार कलमान्वये गुन्हा केला असून सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक करीत आहे.
पुढील कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी चिमूर दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वाखाली पोहवा. सचिन साठे, पोअं. सचिन खामनकर, पो.अं. रुपेश शामकुळे, सौरभ महाजन यांनी केली आहे.
ज्वाला समाचार सच का सामना