Breaking News

पालकमंत्र्यांचा पुढाकारातून राळेगाव शहरात विकासकामाला मिळाले २ कोटी ३३ लाख 31 हजार रुपये

Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar.in

 

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे

राळेगाव :- राळेगांव येथील नगर पंचायतीचे उपाध्यक्ष जानराव गिरी यांच्या नेतृत्वात काही महिण्या पूर्वी काँगेस पक्षातून शिवसेना शिंदे गटात अनेक कार्यकर्त्या सह पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला होता त्यानंतर जानराव गिरी यांनी ना. पालकमंत्री संजय राठोड यांच्या कडे शहरातील विकास कामाकरीता निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली होती या मागणीची दखल घेवून पालकमंत्री संजय राठोड यांनी नगरपंचायतला दोन कोटी तेहतीस लाख एकतीस हजार रुपयांचा निधी दिला असून या निधीतून राळेगाव शहरांमध्ये विविध विकासकामे होणार आहेत. या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून लगेच हे काम सुरू होणार असल्याने शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

राळेगांव शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील बंदिश पिंपरे ते बळवंत भोयर यांच्या घरापर्यंत सिमेंट रोडचे काम ,नंतर प्रभाग क्रमांक ११ मधील नरेश घोडाम ते ताकसांडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रोडचे बांधकाम, प्रभाग क्रमांक चारमधील मुकुंद बागडे यांच्या घरासमोरील शिव मंदिर परिसरात सभागृहाचे बांधकाम, प्रभाग क्रमांक दहामध्ये कवडू उईके ते संजय हातआगळे यांच्या घरापर्यंत बंदिस्त नालीचे बांधकाम तसेच प्रभाग क्रमांक नऊमधील श्रीराम मंदिर ते भास्कर चिव्हाणे यांच्या घरापर्यंत सिमेंट रोडचे बांधकाम, प्रभाग क्रमांक ११ मधील लता माटे ते सुरेश ठाकूर यांच्या घरापर्यंत बंदिस्त नालीचे बांधकाम तसेच प्रभाग क्रमांक ११ मधील राजेंद्र दुधपोळे ते दुर्गामाता मंदिर पर्यंत सिमेंट रोडचे बांधकाम, प्रभाग क्रमांक चारमधील वसंतराव देवघरे ते दत्ता येंडे तसेच रामोजी येंडे यांच्या घरापर्यंत बंदिस्त नालीचे बांधकाम.

तसेच हिंदू स्मशानभूमीमध्ये काँक्रीटच्या दहन शेडचे बांधकाम करणे व स्ट्रीट लाईट सौंदर्याकरण करणे तसेच प्रभाग क्रमांक १२ मधील अंगणवाडी समोरील पेवर ब्लॉक बसविणे, प्रभाग क्रमांक १२ मध्ये बिरसा मुंडा चौक ते पवन दुबे यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा पेवर ब्लॉक बसविणे, आदींसह इतर विविध विकासकामांचा समावेश आहे. दोन कोटी तेहतीस लाख ३१ हजार रुपयांचा निधी राळेगाव नगरपंचायतला प्राप्त झाला असून लगेच ही काम सुरू होणार आहेत. या कामामुळे शहराच्या सौंदर्यामध्ये तसेच विकासात भर पडणार आहे.विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या कामांमध्ये हिंदू स्मशानभूमीसाठी ३७ लाख ५० हजाराचा निधी प्राप्त झाला आहे.अलीकडच्या काळामध्ये हिंदू स्मशानभूमीचे मोठ्या प्रमाणात सौंदयोंकरण झाले असून आणखी मॉर्निंग ग्रुप व नगरपंचायतच्या सहकायनि स्मशान भूमीमध्ये मोठ्या प्रमाणात सौंदर्याकरण सुरू आहे.

# अवघ्या काही दिवसातच दलीतवस्तीचा निधी उपलब्ध होईल*
शहरातील दलीत वस्ती योजनेअंतर्गत होणाऱ्या विकास कामा करिता ७५ लाख रुपयाचा निधी अवघ्या काही दिवसात उपलब्ध होणार आहे.राळेगाव शहरात अवघ्या काही दिवसांत मोठे विकास कामे होणार आहे, यामध्ये प्रामुख्याने वाढीव विद्युत पोल बसवणे, या सर्व कामाकरिता राज्याचे पालकमंत्री नामदार संजय भाऊ राठोड यांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार आहे हे मात्र विशेष.
*जानराव गिरी नगर पंचायत उपाध्यक्ष राळेगाव*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

26 जुन पासुन शाळा सुरू करा – कवडू लोहकरे यांची मागणी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved