Breaking News

गुणवत्ता प्राविण्य प्राप्त विद्यार्थीनींचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

 

Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar.in

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- चिमूर तालुक्यातील मौजा पिंपळनेरी येथील शांतिनगर हनुमान मंदिर परिसरात दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी रविवारच्या दिवशी गुणवत्ता प्राविण्य प्राप्त मेरिट विद्यार्थीनींचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम ज्ञानेश्वर उर्फ नाना शिरभय्ये यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत व धार्मिक कार्यात योगदान देत आयोजित करण्यात आला होता.गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाविद्यालय, चिमूर येथील २०२४-२५ सत्रातील गुणवंत विद्यार्थीनींचा या सोहळ्यात सत्कार करण्यात आला. यामध्ये कु. अक्षया बापूराव वाकूळकर (बी.कॉम.) – द्वितीय क्रमांक, कु. प्रियंका विनेश शिरभय्ये (एम.ए. अर्थशास्त्र) – तृतीय क्रमांक, कु. मयुरी वसंता चभोर (एम.कॉम.) – दहावा क्रमांक या विद्यार्थीनींचा प्रमुख अतिथी मान्यवरांच्या हस्ते गुरुदेव टोपी, शिल्ड, प्रशस्तीपत्र व ‘ग्रामगीता’ देऊन गौरव करण्यात आला.

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विजयभाऊ घरत, अधिसभा सदस्य, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, माजी जिल्हा परिषद सदस्य, तसेच प्रभाकरजी शिरभय्ये, केंद्रीय कार्यकारी सदस्य व उपाध्यक्ष विदर्भ कुर्मी समाज नागपूर, मा. प्रकाशजी कटमुसरे, माजी प्राचार्य, नेमदेव पाटील महाविद्यालय मांढळ (नागपूर), संध्या प्रकाश कटमुसरे (नागपूर) आणि सुरेखा अथरगडे (चिमूर) उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थिनींना व उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन कवडूजी लोहकरे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन यश ज्ञानेश्वर शिरभय्ये यांनी केले. यावेळी हनुमान मंदिर देवस्थान, शांतिनगर पिंपळनेरी यांना १५×३० आकाराची मॅट चटई भेटवस्तू म्हणून प्रदान करण्यात आली. तसेच गुरुदेव सेवा भजन मंडळ वडाळा पैकू आणि ग्रामविकास भजन मंडळ शांतिनगर पिंपळनेरी (पुरुष व महिला) यांच्या भजन, संगीत, पूजाअर्चा सहयोगाबद्दल त्यांचा सत्कार गुरुदेव टोपी, सामुदायिक प्रार्थना वही आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. सोहळ्याची सांगता आयोजक श्री. ज्ञानेश्वर उर्फ नानाभाऊ शिरभय्ये, सचिव गुरुदेव सेवा भजन मंडळ वडाळा पैकू, माजी सरपंच व माजी कार्याध्यक्ष – विदर्भ कुर्मी समाज जिल्हा चंद्रपूर यांच्या हस्ते करण्यात आली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

26 जुन पासुन शाळा सुरू करा – कवडू लोहकरे यांची मागणी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved