Breaking News

निसर्गराज्याने बळीराजाच्या तोंडचा घास हिरावला

Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar.in

* सोयाबीन गेलं, आता धानही वाहुन गेलं *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- चिमूर तालुक्यातील खडसंगी कृषी व तलाठी मंडळ कार्यालय अंतर्गत येणाऱ्या रेंगाबोडी (सोनेगाव वन) येथील शेतकरी अभिमान उद्धव राऊत यांच्या चार एकर शेतात सोयाबीन व धान पिकांची लागवड करण्यात आली होती.मात्र, अवकाळी पावसाच्या तडाख्याने सोयाबीन पिक आधीच पूर्णतः नष्ट झाले, आणि आता हातात येणारं धान पिक सुद्धा परतीच्या अतिवृष्टीने भुईसपाट झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडातला घासदेखील निसर्गराज्याने हिरावून घेतला आहे.

अचानक झालेल्या या नुकसानीमुळे अभिमान राऊत यांच्यासह परिसरातील शेतकरी वेटाळलेले असून, “जगावे की मरावे?” असा यक्षप्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे.

यावर्षी राज्यभरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन या नगदी पिकाची लागवड केली होती. मात्र, निसर्गाच्या अनियमिततेमुळे वेळोवेळी शेतकऱ्यांना फटका बसत आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी जिकडून मिळेल तिकडून कर्ज काढून शेती केली, परंतु अवकाळीने पुन्हा दगा दिला.रेंगाबोडी परिसरातील तीन एकरांमधील धान पिक पूर्णतः उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी अभिमान उद्धव राऊत यांनी प्रशासनाकडे केली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

26 जुन पासुन शाळा सुरू करा – कवडू लोहकरे यांची मागणी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved