Breaking News

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मैदानी स्पर्धेचे थाटात उद्घाटन

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

* विद्यार्थी व खेळाडूंनी मोबाईल पासून दूर राहून मैदानी खेळ खेळा – नामदार संजय सावकारे *

विशेष प्रतिनिधी – नागपूर

नागपूर :- केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय यांच्या वतीने दरवर्षी दि. २९ ऑगस्ट, हा दिवस “मेजर ध्यानचंद” यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताच्या समृद्ध क्रीडा वारशाचा आणि जागतिक व्यासपीठांवर देशाला अभिमान वाटणाऱ्या आपल्या खेळाडूंच्या कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी आहे. सन २०२५ या वर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन हा ऑलिंपिक भावना आणि उत्कृष्टता, मैत्री आणि आदर या मूलभूत मूल्यांना भारताची आदरांजली म्हणून साजरा केला जात आहे. त्यासाठी क्रीडा व युक सेवा संचनालयन महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग व क्रीडा विभाग भुसावळ. यांच्याद्वारे बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ येथे मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते.

सदा स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी बियाणी मिलिटरी स्कुल चे संस्थेचे अध्यक्ष मनोज बियाणी ,सचिव डॉ‌ संगीता बियाणी, तालुका क्रीडा अधिकारी मीनल थोरात, शाळेचे प्राचार्य डी एम पाटील, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप साखरे, क्रीडा भारतीचे बी एन पाटील, राजेंद्र कुलकर्णी, तालुका अथलेटिक्स असोसिएशनचे. रवी चोपडे, निकम, यांच्यासह सर्व खेळाडू प्रशिक्षक पंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक माननीय नामदार संजय सावकारे यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. दीप प्रज्वलन व क्रीडा ज्योत पेटवून तसेच हवेत बलून सोडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.नंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, ना.संजय सावकारे यांनी खेळाडूंना संबोधित करताना विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून लांब राहून मैदानावरती खेळ खेळले पाहिजे आपला राष्ट्रीय खेळ हॉकी आहे त्यामध्ये मैदानावरती आपल्याला सतत धावावे लागते व चेंडू कडे एकाग्र राहून लक्ष ठेवावे लागते. खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला उच्च पदावर ती जाता येते. हे मेजर ध्यानचंद,महेंद्रसिंग धोनी अशा विविध खेळांनी दाखवून दिलेले आहे.खेळा करियर म्हणून निवडा व खेळा.सर्वांना स्पर्धेसाठी विजयासाठी व राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

एसआयआर अंतर्गत 100 टक्के घरोघरी जाऊन होणार मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved