Breaking News

मारेगाव ठाणेदार उमेश बेसरकर यांची एक्झिट – हृदयविकाराचा तीव्र झटका – वणी येथे उपचारदरम्यान मृत्यू

धक्कादायक

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे 

मारेगाव :-  येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर (57) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज शनिवार सकाळी दहा वाजता निधन झाले. ठाणेदार बेसरकर यांच्या अकाली एक्झिटने पोलीस वर्तुळात शोककळा पसरली आहे.

गत दोन महिन्यापूर्वी 14 जून 2025 रोजी मारेगाव पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाले होते. तालुक्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात त्यांच्यात सातत्य होते.मनमिळावू स्वभाव आणि न्यायिक भूमिकेने त्यांचा सूस्वभाव मारेगावकरांसाठी औटघटकेचा ठरल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, आज कर्तव्यावर असतांना अचानक छातीत दुखू लागले. तात्काळ मारेगाव येथे प्राथमिक उपचारा नंतर वणी येथे हलविण्यात आले. मात्र,उपचाराला प्रतिसाद न दिल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ठाणेदार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा आप्तपरिवार आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

एसआयआर अंतर्गत 100 टक्के घरोघरी जाऊन होणार मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved