Breaking News

चिमूर पोलीसांची धडक कारवाई घरफोडीच्या आरोपीला केली अटक

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

*पोलीसांनी 1,40,000/- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त*

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- दिनांक 11/08/2025 रोजी तक्रारदार रामदास वाघमारे रा. कन्हाळगाव ता. चिमूर हा त्याचे पत्नीसह नेहमी प्रमाणे शेतात सकाळी 09/00 वाजताच्या सुमारास कामाकरीला गेले असता सायंकाळी अंदाजे 07/00 वाजता घरी परत आले तेव्हा घराची पाहाणी केली असता घराचा मागचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांना शंका आली यामुळे त्यांनी घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागीने बघितले असता त्यांना कुठलेही दागीने दिसुन आलेले नाही. कोन्ही तरी अज्ञात आरोपीने त्याचे दागीने चोरी केल्या बाबत त्यांने पोलीस स्टेशन चिमूर येथे तक्रार दिली.

सदरची तक्रार प्रप्त होताच पोलीस स्टेशन चिमूर येथील गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी भेट दिली व आजु बाजुचे परिसरात आपले गोपणीय सुत्रधार नेमले. यास दरम्याण गोपणीय सुत्रानकडून माहिती प्राप्त झाली की, सदर चोरी ही तक्रारदाराचे गावातच राहणारा इसम नामे रोशन बबन वाघमारे वय-33 वर्ष धंदा-मजुरी रा. कन्हाळगाव ता. चिमूर जि. चंद्रपुर याने केल्याची शक्यता आहे. सदर माहितीची शहानिशा करुन संशईत आरोपीची सखोल चौकशी केली असता आरोपीने गुन्हा कबुल केला. आरोपीस अटक करुन त्याची एक दिवस पोलीस कोठडी मिळविण्यात आली त्याच दरम्याण आरोपी कडुन चोरी गेलेला मु‌द्देमाल 1) सोन्याच्या बागड्या 2 नग वजन 40.50 ग्रॅम कि, 80,000/- रु 2) सोन्याचे मंगळसूत्र 1 नग वनज अंदाजे 20 ग्रॅम कि. 40,000/- रु, व 3) 20,000/- रु नगदी असा एकुन 1,40,000/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक इश्वर कातकडे, उप विभागीय पोलीस अधिकारी चिमूर दिनकर ठोसरे, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन चिमूर दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनात डी. बी. पथकातील स. फौ. विलास निमगडे, पो.अं रोहीत तुमसरे पो.अं. सचिन खामनकर, पो.अं. सोनु पो.अं. सचिन साठे यांनी केली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

किराणा सामान व पिकअप वाहन चोरी करणारे तिन आरोपींना पकडण्यात पोलीसांना यश

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

महाराष्ट्रातील 29 महापालिका महापौर आरक्षण सोडत जाहीर

    1. छत्रपती संभाजीनगर: सर्वसाधारण (महिला) 2. नवी मुंबई: सर्वसाधारण 3. वसई- विरार: सर्वसाधारण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved