Breaking News

उमंग कला महोत्सव व कलाकार सोहळ्याचे १० ऑगष्टला आयोजन

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

* ऱ्हास पावलेल्या कलांना नविन रंगमंच देऊ – शंकरराव रामटेके *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर 

चंद्रपूर :- विदर्भातील तसेच ग्रामीण भागातील अनेक कलाकारांमध्ये कला गूण भरून आहेत. पण आजच्या घडीला त्यांना वाव मिळत नाही. अश्याच कलेंना शासन दरबारी व जनतेत जागृतता घडवण्यासाठी विदर्भ शाहिर कलाकार परिषद कन्हान ( नागपूर) तर्फे १०ऑगष्ट २०२५ रोजी उमंग कलामहोत्सव व सत्कार सोहळा आयोजीत केला असून चंद्रपूर जिल्हातील कलाकारांना होणाऱ्या महोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन विदर्भ शाहिर कलाकार परिषदेचे अध्यक्ष शंकरराव रामटेके यांनी केले आहे.

ग्रामिण भागात प्रामुख्याने दंडार, गोंधळ, खडी गंमत, पोवाडा, डाहका, भजन, कीर्तन, रोवण्यातील गाणी अश्या अनेक पूर्वीच्या कला आढळून येतात पण आजच्या काळात त्यांचा ऱ्हास होत आहे. त्या कलेंना जिवंत ठेवण्यासाठी विदर्भ शाहिर कलाकार परिषद रंगमंच उपलब्ध व शासणाच्या मिळणाऱ्या मानधन व त्यासाठी करणारी खटपट या सर्व गोष्टीवर प्रात्यक्षिक माहिती अश्या कलाकारांना महोत्सवातून दरवर्षी देत आहे. याचाच फायदा व आपल्या कलांगूणांना जनतेच्या नजरेत आणून देण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व कलांकारांनी होणाऱ्या महोत्सात सहभाग नोंदवावा असे आवाहन विदर्भ शाहिर कलाकार परिषद कन्हान (नागपूर) तर्फे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष शंकरराव रामटेके यांनी केले आहे.

*जिल्हातील अनेक कलाकारांच्या मानधन फाईल त्रुटीमद्ये जाण्याचे कारण म्हणजेच की शासनाने वेळोवळी घेतलेल्या निर्णयाबाबत माहिती नसणे. या करीता विदर्भ शाहीर कलाकार परिषद अश्या महोत्सवाचे आयोजन करीत असते त्याचा लाभ विदर्भातील व चंद्रपूर जिल्हातील कलाकारांनी घ्यावे. महोत्सवात सहभागी होण्याकरिता कलाकारांनी थेट संपर्क करावे.शंकरराव रामटेके चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष, विदर्भ शाहीर कलाकार परिषद कन्हान*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved