jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
पांढरकवडा :- केळापूर तालुका येथील गोपालपूर येथे सिताराम नागोराव आत्राम वय ६५ वर्ष यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. ६ ऑगस्ट रोजी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास घडली. कामासाठी शेतात गेलेल्या सिताराम आत्राम यांनी पाऊस पडत असल्याने चिंचेच्या झाडाखाली आसरा घेतला होता, मात्र अचानक वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मृत सिताराम आत्राम हे गोपालपूर येथील रहिवासी असून ते सतीश गोपालराव चिंतावार यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करत होते. सकाळी १० वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे ते शेतात गेले होते. दुपारी शालु सुरेश आत्राम हिने फोनवर ही माहिती मुलगा अर्जुन सिताराम आत्राम याला दिली. त्याने घटनास्थळी धाव घेतली असता, वडील चिंचेच्या झाडाखाली बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना पांढरकवडा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं.
ज्वाला समाचार सच का सामना