Breaking News

अवैधरित्या मोहादारु काढणाऱ्या महिलांविरुध्द कारवाई – ८ महिला आरोपींना अटक

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

* मोहादारु, मोहासडवा व इतर असा १,४१,४६०/- रुपयाचा मु‌द्देमाल जप्त *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- दिनांक ०५/०८/२०२५ रोजी पोस्टे चंद्रपूर शहर येथील गुन्हे शोध पथक अधिकारी व अंमलदार पो. स्टे. परिसरात वॉश ऑऊट मोहीम पेट्रोलींग करीत असता गोपनिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, महाकाली कॉलरी आनंदनगर चंद्रपूर येथे काही घरात मोहा सडवा, मोहा दारू, देशी दारू बाळगुन विक्री करीत असल्याचे माहितीवरुन चंद्रपूर शहर पोलीस, पंच, वजन मापधारक, फोटोग्राफर सह घटनास्थळी कारवाई करणे करीता पोहचले असता, काही महीलांचे राहते घरी मोहा सडवा, मोहा दारू, देशी दारू मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन पंचासमक्ष कायदेशीररित्या घराची घरझडती घेतली असता.

आरोपी नामे क. १) लक्ष्मी अशोक दहागावकर वय ४६ वर्ष, (२) कांता प्रकाश चापडे वय ५६ वर्ष, (३) छाया शंकर दुर्गे वय ५० वर्ष, (४) तुळशी दिपक मेश्राम वय ३७ वर्ष, (५) शशीकला त्रिमोहन बुटले वय ४१ वर्ष, (६) माया लक्ष्मण दुर्गे वय ५८ वर्ष, (७) मोनिका विजय दुर्गे वय ३६ वर्ष, (८) सुशिला मुरलीधर ठाकरे, वय ६० वर्ष यांच्याकडे (१) मोहा दारू ४८५ लि. प्र.लि.७० रू. प्रमाणे किंमत ३३,९५०/-रू. (२) मोहा सडवा १२८० लि. प्र.लि ५० रू. प्रमाणे किंमत ६४,०००/- रू. (३) मोहा दारू काढण्याकरीता वापरण्यात आलेले ईतर साहित्य किंमत ४२, १५० रू. आणि (४) एकुण ३४ नग ९० एम.एल नी भरलेल्या देशी दारूच्या प्लास्टीक शिश्या प्रत्येकी ४० रूपये प्रमाणे किंमत १३६०/-रूपये असा एकुण १,४१,४६०/-रूपये चा मुद्दे‌माल जप्त करण्यात येवुन आरोपी महिलांविरुध्द दारुबंदी कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहे.

सदरची कारवाई मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, सुधाकर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके यांचे नेतृत्वात पोउपनि. मनिष तालेवार, वैभव चव्हाण, म.पो.हवा. भावना रामटेके, पो. हवा. सचिन बोरकर, लक्ष्मण रामटेके, संजय धोटे, ईमरान शेख, निकेश ढेंगे, जावेद सिध्दीकी, मल्लेश नरगेवार, प्रविण रामटेके नापोशि. कपुरचंद खरवार, पो.अं. योगेश पिदुरकर, निलेश ढोक, विक्रम मेश्राम, रूपेश पराते, मपोशि. सारीका गौरकार, दिपीका झिंगरे यांनी केलेली आहे

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved