Breaking News

शेवगाव येथील माजी सैनिक संघाच्या वतीने कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान

 

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव :- दिनांक 27 जुलै 2025 वार रविवार या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगांव तालुक्यातील विविध क्षेत्रातील कार्यक्रमात माजी सैनिक संघाच्या वतीने माजी सैनिक संजय डोंगरे तालुक्यातील वाघोली गावच्या विकासाचे शिल्पकार उमेश भालसिंग मौजे खामगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ विद्या अरुण बडदे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नीरज लांडे ज्येष्ठ पत्रकार शाम पुरोहित व डॉ. सुनिल बडे राध्येशाम हॉस्पिटल यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी शेवगाव येथील माजी सैनिक संघाच्या वतीने कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाविद्यालयीन तसेच विद्यालयीन विद्यार्थ्यांच्या रॅलीत भारत माता की जय वंदे मातरम आदी घोषणांनी शहर दुमदुमून गेले.

या रॅलीत माजी सैनिक संघाच्या पदाधिकारी सदस्यांसह शहरातील पद्मभूषण बाळासाहेब भारदे रेसिडेन्सी अल आबासाहेब काकडे त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान आदर्श माध्यमिक विद्यालय ज्ञानदीप विद्यामंदिर प्रशाळेतील हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते विद्यार्थ्यांच्या रॅलीवर ठीक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली तहसील कार्यालयापासून निघालेली रॅली क्रांती चौक बस स्थानक चौक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या प्रांगणात दाखल झाल्यानंतर महाविद्यालयाच्या राजश्री शाहू महाराज सभागृहात प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे,नवनिर्वाचित तहसीलदार आकाश दहाडदे,पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, गटविकास अधिकारी सोनल शहा, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता प्रल्हाद पाठक, वन अधिकारी सचिन घनवट, माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण सामाजिक कार्यकर्ते सुनील रासने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक बबनराव धावणे कल्याणराव भागवत वेगवेगळ्या माध्यमिक विद्यालयातील प्राचार्य शिक्षक महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉक्टर युवराज सुडके भाऊसाहेब अडसरे भूमी अभिलेख कार्यालयाचे बाळासाहेब कोकणे भारदे माध्यमिक विद्यालयाचे एनसीसी विभागाचे कमांडर भाऊसाहेब शिंदे माजी सैनिक संघाचे तालुकाध्यक्ष विनोद शेळके उपाध्यक्ष शिवाजी बडे सचिव भक्तराज केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या आजी-माजी सैनिकांच्या अभिवादन सभेत प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी देशाच्या संरक्षणासाठी प्रसंगी बलिदान केलेले आजी-माजी सैनिक समाजाचा अनमोल पद्धतीचा ठेवा आहे.

त्यामुळे कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने एक दिवस नव्हे तर आजी माझी सैनिकांना समाजाकडून सतत सन्मानाची वागणूक मिळणे आवश्यक आहे. आजच्या युवा पिढीने सैनिकांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन आपले काम मग ते कोणतेही असो निस्वार्थी भावनेतून प्रामाणिकपणे पार पाडून समाजाची सेवा करण्याची स्फूर्ती आणि प्रेरणा घेणे आवश्यक असल्याचे नमूद केले माजी सैनिक संघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव बडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले अध्यक्ष विनोद शेळके यांनी आभार मानले तर दीपक कुसळकर यांनी सूत्रसंचालन केले, या कार्यक्रमाला अनिल म्हस्के रविंद्र काळे नानाभाऊ पायघन भगवान खेडकर हरीश्चंद्र शिंदे सुरेश आव्हाड उपस्थित होते

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved