Breaking News

नागभीड पोलीसांनी कांपा परीसरात वेगवेगळया ठिकाणी मोहा हातभट्टी अड्डयावर टाकल्या धाडी

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर : – दिनाक 16.07.2025 रोजी पो.स्टे. नागभीड अंतर्गत कान्पा परीसरातील जंगलात अवैध मोहा हातभट्टी दारू अड्डड्याबाबत ची गोपनिय माहीती काढुन कार्यवाही करण्यात आलेली आहे. यात (1) आरोपी नामे राहुल तिमाजी मोहनकर वय 27 वर्षे रा. कान्पा हा जंगलात हातभट्टी लावुन मोहाची दारू काळीत असताना त्याचे कडे मोहादारू 40 लिटर व मोहा फुल सडवा 350 किलो व साहीत्य असे एकूण 22,700/- रूपये चा मुद्देमाल मिळून आला. (2) आरोपी नामे विलास सुर्यभान खोब्रागडे वय 38 वर्षे रा.कांपा ही जंगलात हातभट्टी लावुन मोहा दारू गाळीत असताना त्याचे कडे मोहादारू 30 लिटर व मोहा फुल सडवा 1050 किलो व साहीत्य असे एकुण 53,700/- रूपये चा मुद्देमाल मिळुन आला.

(3) आरोपी नामे महेंद्र तिमाजी मोहनकर वय 34 वर्षे रा. कान्या हा जंगलात हातभट्टी लावुन मोहा दारू गाळीत असताना त्याचे कडे मोहा फुल सडवा 950 किलो व साहीत्य असे एकूण 45,200/- रूपये चा मुद्देमाल मिळुन आला. (4) आरोपी नामे रविंद्र धनराज अलोने वय 35 वर्षे रा. कान्पा हा जंगलात हातभट्टी लावुन मोहा दारू गाळीत असताना त्याचे कडे मोहा फुल सडवा 900 किलो व साहीत्य असे एकुण 42,950/- रूपये चा मुद्देमाल मिळुन आल्याने नमुद 04 आरोपी विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये कार्यवाही करून त्यांचेकडुन एकुण 1,61,550/- रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कार्यवाही मुम्मका सुदर्शन पोलीस अधिक्षक, ईश्वर कातकडे अपर पोलीस अधिक्षक दिनकर ठोसरे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली रमाकांत कोकाटे पोलीस निरीक्षक पो.स्टे. नागभीड यांचे नेतृत्वात सफौ. /७३१ सुरसेन बिके पो. अं./१०२५ किशोर देशमुख, पो.अं./२२० ज्ञानेश्वर गिरडकर, पो.अं./१९७१ दिलीप चौधरी, पो.अं./१४७९ भरत घोळवे, म.पो.अं./१५५६ महानंदा आंधळे, म.पो.अं./३९९ अरूणा धुर्वे यांचे पथकाने केली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved