jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
*चोरीस गेलेला मोबाईल व गुन्हयात वापरलेले वाहन असा एकुण ६०,०००/- रुपयेचा मुद्देमाल केला जप्त*
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- दिनांक १५/७/२०२५ रोजी विवेक पांडुरंग कोटनाके वय ३१ वर्ष रा. एकारा हे रात्रौ २१:०० वाजता सुमारास मौजा चामोर्शी फाटा मुल रोडवरुन जात असतांना मोटार सायकल क्र. MH34-T-561 चा स्वार त्याचे मागे बसलेला इसम असे दोद्यांनी हातातील मोबाईल हिसकावून चोरुन पळुन गेले असल्याची रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन मुल येथे अपराध क्रमांक २५५/२०२५ कलम ३०४, ३(५) भारतीय न्याय संहिता-२०२३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
मुल पोलीसांनी विवेक कोटनाके सांगितलेल्या आरोपीतांचे कपडयाचे वर्णन व मोटार सायकल क्रमांकावरुन आरोपी निष्पन्न करुन आरोपी नामे (१) तनिश ओम मंडलेकर वय १९ वर्ष रा. ताडाला रोड, मुल (२) क्रिशन प्रेमदास शेडमाके वय १९ वर्ष रा. हळदी ता. मुल यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन गुन्हयातील चोरलेला फिर्यादीचा पोको कंपनी मोबाईल किं. १०,०००/- रु. आणि गुन्हयात वापरलेली मोटार सायकल क्र. MH34-T-561 किं. ५०,०००/- रु. असा एकुण ६०,०००/- रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला असुन पुढील तपास मुल पोलीस करीत आहे.
सदरची कार्यवाही मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर आणि सुधाकर यादव उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर प्रभारी उपविभाग-मुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे मुल चे पोलीस निरीक्षक विजय राठोड यांचे नेतृत्वात सपोनि सुबोध वंजारी, पोहवा /२४० जमीर खान पठाण, पोहवा /२३९७ भोजराज मुंडरे, नापोअं/२४९७, पोअं/१८३ नरेश कोडापे, पोअं/१२३२ शंकर बोरसरे, पोअं/१३९ संदीप चुधरी सर्व पोलीस स्टेशन मुल यांनी केली आहे.
ज्वाला समाचार सच का सामना