jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
वर्धा :- वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे दि.10/07/25 रोजी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील पथकाला माहीती मिळाली की, आरोपी नामे विजय शरद राउत वय 26 वर्ष रा. खैराटी पारधी बेडा ता. हिंगणघाट हा खैराटी पारधी बेडा कडून हिगणघाट कडे गावठी मोहा दारू ची मोटार सायकलने वाहतूक करीत येत आहे अश्या माहीती वरून हिगणघाट पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार प्रविन बोधाने, स्वप्नील जिवने , पोलीस अमलदार प्रमोद डडमल , सागर सामृतवार यांनी नाकेबंदी करुन आरोपी विजय शरद राउत रा. खैराटी पारधी बेडा ता. हिंगणघाट याचेवर प्रोरेड केला असता.
आरोपी हा त्याचे ताब्यातील हिरोहोन्डा अँम्बीशन कंपनीची मो.सा.क्र.एम.एच 32 एच 1141 ने गावठी मोहा दारुची वाहतुक करतांना पंचासमक्ष मिळुन आल्याने आरोपीचे ताब्यामधुन दोन प्लास्टिक थैलीतील पन्नीमध्ये 20 लिटर गावठी मोहा दारू प्रती लिटर 100 रू प्रमाणे 2000 रू.व हिरोहोन्डा अँम्बीशन कंपनीची मो.सा.क्र.एम.एच 32 एच 1141 किंमत 20,000 रु ,दोन थैली किंमत 20 रु असा एकुण 22,020 चा माल अवैधरीत्या मिळुन आल्याने जागीच मोका जप्ती पंचनामा कारवाई करून आरोपी विरूद्ध, पो.स्टे. हिंगणघाट येथे दारूबंदी कायद्यान्वये कारवाई केली.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अनूराग जैन साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक वाघमारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत साहेब, याचे मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक देवेंद्र ठाकूर साहेब, याचे निर्देशाप्रमाणे पोलीस हवालदार प्रविन बोधाने, स्वप्नील जिवने , पोलीस अमलदार प्रमोद डडमल,सागर सामृतवार यांनी केली.
ज्वाला समाचार सच का सामना