Breaking News

पोलीसांनी केले घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- येथील मुख्य महामार्गावरील पेट्रोलपंपासमोरील प्रशांत कृषी केंद्राच्या छतावरून लोखंडी दरवाजा तोडून आत प्रवेश करीत दुकानातील रोकड व इतर साहित्यांची चोरी केली. याप्रकरणी चिमूर पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या वेकोलिच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास अटक केली. नीळकंठ गुलाब बागळे (६५, रा. वडाळा पैकू) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून चोरीला गेलेल्या साहित्यांसह रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.

१५ जूनच्या मध्यरात्री प्रशांत कृषी केंद्राच्या छतावर चढून लोखंडी दरवाजा तोडून आरोपीने दुकानात प्रवेश केला. यावेळी चोरट्याने दुकानातील सामान अस्ताव्यस्त फेकून एक जुना मोबाइल अंदाजे किंमत १० हजार, गल्ल्यातील नगदी २० हजार रुपये, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर अंदाजे किंमत ९ हजार रुपये असा एकूण ३९ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. १६ जून रोजी सकाळी दुकानदाराच्या चोरी झाल्याचे लक्षात येताच चिमूर पोलिसांनी अपराध क्रमांक २३४/२०२५ कलम ३३१ (४), ३०५ (अ) भान्यासं २०२३ अन्वये गुन्हा नोंदविला. गुन्ह्याच्या तपासात गुप्त बातमीदाराच्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी वेकोलिचे सेवानिवृत्त कर्मचारी नीळकंठ गुलाब बागळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. या चौकशीदरम्यान, त्याने प्रशांत कृषी केंद्र दुकानात आत प्रवेश करून चोरी केल्याची कबुली दिली. या कारवाईत आरोपीच्या ताब्यातून चोरीला गेलेला मोबाइल, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर, ५ हजार ३० रुपये रोख रक्कम, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई उपविभागीय अधिकारी राकेश जाधव यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक संतोष बाकल, साहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील विलास निमगडे, रोहित तुमसरे, शिव लाडेकर, रूपेश श्यामकुळे यांनी केली आहे

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved