Breaking News

ऑफिसातील रात्रीतुन लाखो रुपयांचे सामान गायब केले कोणी- चोरांवर मोर झालं कोण ???

 

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव :- दिनांक 15 जुन 2025 वार रविवार ~ या बाबत सविस्तर वृत्त असे कि हजारो लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणुक केलेल्या भामट्या साईनाथ कवडे चे सुमारे एकरभर जागेत असलेले रावतळे कुरुडगाव येथील आलिशान ऑफिस गेल्या चार ते पाच वर्षांपासुन फसवणुकीचे केंद्रबिंदू होते. भामटा साई कवडेच्या “असिटेक सोल्युशन” या कार्यालयातील आलिशान ऑफिसमध्ये चोराच्या घरी दरोडा घातला कोणी ??? रात्रीतुन लाखो रुपये किमतीचे सामान गायब साईनाथ कवडे या भामट्याच्याच सांगण्या वरून त्याच्याच भामट्या फरार कर्मचाऱ्यांनी व अंगावर गोंदउन त्याच्याबरोबर फरार काळात सावली सारखे फिरणारे दोन भामटे आणि एक जिवलग मित्र सध्या नॉट रिचेबल आहेत.

अहिल्यानगर पोलिसांच्या रडारवर असलेले भामट्या साई कवडेच्या सांगण्यावरून कार्यालयाच्या परिसरातील जम्बो जनरेटर कार्यालयातील सुमारे डझनभर A. C. सुसज्ज लाखो रुपयांची गुंडपुंड यांना व्यायाम करण्यासाठी असलेली GYM कार्यालयातील मौल्यवान वस्तू सि.सि. T. V. त्याचा DVR फुटेज आवारातील शेड त्याची फरशी दरवाजे खिडक्या किमती फर्निचर कपाटे टेबल खुर्च्या रात्रीतुन कोणी लंपास केल्या. परिसरातील सिमेंटचे, ब्लॉग, बांधकाम साहित्य, पत्रे व शेड कॉम्प्युटर. भामट्या साई कवडेला साई सर साई सर म्हणणाऱ्या त्याच्याच ऑफिसच्या माजी कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या अंधारात चोरासारखे गायब केले.अशीच लोकांच्या कष्टाच्या पैशातून हरामाची घेतलेली शेती गाड्या घोड्या सोन नान सगळं एम.पी.आय.डी कायद्याने जप्त होण्याच्या भीतीने रात्रीतुन कोणी केले गायब ??? भामटा साई कवडे फार कमी लोकांना प्रत्यक्ष प्रत्यक्ष भेटत असे त्याने त्याकाळी काही पाळलेले त्याचा सर्व कारभार पाहत असत सकृत दर्शनी ते सुद्धा तपासी अधिकाऱ्यांनी सह आरोपी का केले नाही याचा गहन प्रश्न कोट्यावधी रुपयांची फसवणुक झालेल्या लोकांना पडला आहे. उर्वरित फरार सुमारे दीड डझन भामट्याना वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतंय कोण ???

*ताजा कलम*

पोलिसांनी साई कवडेला अटक केल्या नंतर त्याचे फरार सरपंच आई बाप भाऊ आणि सुमारे 18 कर्मचारी आणि त्याचे जिवलग मित्र यांची नाव सह आरोपी म्हणुन चार्जशीट मध्ये दाखल करणार का ??? गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेले आई बाप आणि भाऊ यांच्या मुसक्या आवळायला उशीर करत आहेत अहिल्यानगर पोलीस ??? या सगळ्या चा गैर फायदा घेऊन कार्यालयातील सुमारे कोटभर रुपयांचे सामान आणि किमती वस्तू महत्वाची पुराव्याची कागतपत्रे गहाळ करण्याचे पाप कोणी केले ??? आणि कोणत्या बड्या सरकारी माश्याचा आणि बड्या पुढाऱ्यांचा याला आशीर्वाद आहे. याची खमंग चर्चा फसवणुक आलेल्या हजारो गुतवणूकदारां मध्ये सुरु आहे.

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved