jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
राळेगाव :- महाविजवितरण कंपनीने स्मार्ट प्रिपेड मिटर बाबतीत ग्राहकांना विश्वासात घेतले नाही या मिटर संबंधित तात्रिक माहिती कंत्राटदार किंवा महाविजवितरण कंपनी देत नाही भविष्यात हेच मिटर चार्जिंग पद्धतीने राहणार असल्याचे सांगितले जात आहे.ग्रामीण भागात शेतकरी, मजुरी करणारे मजुर, छोटे व्यावसायिक कमी उत्पन्न गटातील कुटूंबे महाविजवितरण कंपनीचे ग्राहक आहे स्मार्ट प्रिपेड मिटर चार्जिंग पद्धत गोर गरीब ग्राहकांना अडचणी ची ठरणार आहे.सद्या स्थितीत विजबील भरण्यासाठी पंधरा दिवसांची सवड मिळते स्मार्ट प्रिपेड मिटर मुळे भविष्यात ग्राहकावर रात्री अपरात्री चार्जिंग करणे व विज सप्लाय मिळविणे आर्थिक कमजोर असलेल्या ग्राहकांना खूप कठीण जाणार आहे.
महाविजवितरण बसवित असलेल्या या स्मार्ट प्रिपेड मिटर चा केंद्रसरकारच्या अनुदाना व्यतिरिक्त खर्च भविष्यात ग्राहकाकडून वसुल करु शकते विज वितरण कायदा 2003 मधिल अधिनियम क्रमांक 47(5) अन्वये कोणते मिटर वापरायचे स्वातंत्र व मिटर निवडीचा हक्क ग्राहकांना आहे. या स्मार्ट प्रिपेड मिटर च्या विरोधातील नागपूर मध्ये झालेल्या आंदोलनात आंदोलकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे मिटर सक्तीने बसविले जाणार नाही असे आश्वासन दिले होते तरी सुद्धा
जर तुम्ही जोर जबरदस्ती ने मीटर लावण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (SP) कडुन तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि याला पूर्णपणे MECB वडकी अभियंता जबाबदार असेल यावेळी
राष्ट्रवादी यवतमाळ जिल्हा सरचिटणीस:- स्वप्नील शंकरराव कचवे
अल्पसख्याक तालुका अध्यक्ष :-इरफान शेख
वडकी सर्कल उपतालुका अध्यक्ष :- संजय उदार
विध्यार्थी तालुका उपाअध्यक्ष:- रोहन वेले यांच्यासह सर्व वडकी वासियांनी तीव्र संताप व्यक्त केला.
ज्वाला समाचार सच का सामना