Breaking News

जिजामाता खासगी आय. टी. आय. शेवगांव मार्केटयार्ड येथे शिवराज्याभिषेक दिन उत्सहात साजरा

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव :- दिनांक 07 जुन 2025 वार शनिवार ~ या बाबत सविस्तर वृत्त असे कि काळ दिनांक 06 जुन रोजी 350 व्या शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्सहात संपन्न झाला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे आरोहण करण्यात आले डॉ. क्षितिज घुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला यावेळी प्रमुख वक्ते म्हणुन डॉ. श्रीमती नेहा कांबळे यांनी पालक विद्यार्थी आणि औदयोगिक शिक्षणाचे महत्व व तरुणपणात विद्यार्थ्यानाच्या मनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी यावर सखोल मार्गदर्शन केले माजी प्राचार्य. मोहनराव बडधे माजी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना इतिहासाचे दाखले देत शिवरायांच्या शिराज्याभिषेक सोहळा आणि तत्कालीन अनेक ऐतिहासिक दाखले सप्रमाण दिले.

यावेळी उपस्थित मान्यवर ज्ञानेश्वर कारखान्याचे जेष्ठ संचालक काकासाहेब नरवडे, पंडितराव भोसले,बबनराव भुसारी,सखाराम लव्हाळे विकास नन्नवरे, शंकरराव पावसे,श्रीमती ताराबाई जगदाळे आदी विश्वस्त मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था ज्ञानेश्वर नगर भेंडा व महिला पोलीस कॉन्स्टेबल श्रीमती प्रियांका शिरसाठ शेवगांव पोलीस स्टेशन प्रा एस एस आव्हाड सेवानिवृत्त पर्यवेक्षक आदी मान्यवरांचा अधिकारी आणि कर्मचारी यांनी सन्मान केला या कार्यक्रमाला मार्केट कमिटीचे सभापती नानासाहेब मडके उपसभापती डॉ. सुधाकर लांडे संतोष भुसारी संतोष जाधव चंद्रकांत लबडे यांच्यासह जिजामाता आय. टी. आय. चे प्राचार्य देशमुख धाडगे सर, माळी सर, मेरड सर,शिंदे सर तांभोरे सर, भुकण सर बोडखे सर आणि श्रीमती सोनावणे म्याडम यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक प्रा. दीपक कुसळकर यांनी केले.

*ताजा कलम*

यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. क्षितिज घुले पाटील म्हणाले कि शेवगाव तालुका हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार असुन येथे एम.आय.डी.सी. होणे गरजेचे आहे. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा दाखला दाखला देत पृथ्वी हि शेषनागाच्या डोक्यावर नसुन कष्टकरी कामगार शेतकरी आणि उदयोजक यांच्या श्रमामुळे उभी आहे असे सांगितले भविष्यात A.I. आर्टिफिशियल इंटेलीजीयन्स चा जमाना असणार आहे. आज ज्याला संगणक कळत नाही त्याला अडाणी समजतात तसेच भविष्यात ज्याला A.I. तंत्रज्ञान कळणार नाही त्याला अडाणी समजले जाईल असे त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved