5 जून ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था चिमूर( सफारी हाॅटेलच्या समोर) याठिकाणी पार पडणार समारंभ
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- सर्वत्र 5 जून जागतिक पर्यावरण दिन म्हणून जिकडे तिकडे साजरा केला जातो. त्याचप्रमाणे चिमुर तालुक्यात पर्यावरण संवर्धनाची चळवळ निर्माण करणारे, पक्षी प्रेमी व पुरातण प्रेमी कवडू लोहकरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडणार आहे.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नवोदय पात्र विद्यार्थी, दहावी , बारावीत तालुक्यात प्रथम येणाऱ्या गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामगीताचार्य प्रा.राम राऊत , कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ओबीसी योद्धा रविंद्र टोंगे , पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी टि.आर.महल्ले , अशोक वैद्य, तरूण पर्यावरणवादी मंडळाचे अमोद गौरकार, सामाजिक कार्यकर्ता शुभम मंडपे, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचे तालुकाध्यक्ष यामीणी कामडी , राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचे मार्गदर्शक माधुरी रेवतकर आदी मान्यवर सत्कार समारंभाला उपस्थित राहणार आहेत.तरी जनतेनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पर्यावरण संवर्धन समीती चिमुर , नेरी व भिसीकडून करण्यात येत आहे.
ज्वाला समाचार सच का सामना