jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
उपविभागी अधिकारी अमित रंजन यांचे आदेश
जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे
पांढरकवडा -: विविध प्रकारचे गंभीर गुन्हे करणाऱ्या पांढरकवडा येथील सराईत गुन्हेगारास ६ महिन्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातून तडीपार केले आहे. याबाबतचा आदेश केळापूर उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन यांनी दिले आहेत. सलिमखाॅन याशीन खाॅन पठाण उर्फ सलिम मनियार (वय ४४, रा. मोमीनाबाद काॅलोनी पांढरकवडा ) असे तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
सलिमखाॅन याशीन खाॅन पठाण उर्फ सलिम मनियार याच्यावर शासनाचा महसुल बुडवुन अवैधरित्या गौण खनिज, रेती उत्खनन करुन त्याची अवैधरित्या वाहतुक करणे, अवैध रेती वाहतुकीबाबत स्थानिक पत्रकार यानी त्याचे विरोधात वृत्तपत्रामध्ये बातमी प्रकाशीत केल्यास बातमी प्रकाशीत करणारे पत्रकार यांना सार्वजनिक ठिकाणी धमकी देवुन त्याचा पाठलाग करून त्याची मोटर सायकल अडवून जिवाने मारुन देण्याची धमकी देणे, अवैध गौण खनिज रेतीची वाहतुक करतांना सदर गाडीचे पायलेटींग करणे,मोठी गर्दी जमवणे कर्मचाऱ्याला धमकवणे शस्त्र नेहमी सोबत बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे विविध गुन्हें नोंद आहे. आरोपीमुळे परिसरामधील नागरिक, व्यावसायिकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण होते.
त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठीही नागरिक धजावत नव्हते. त्यास तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव पांढरकवडा पोलिसांकडून तयार करून केळापूर उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन यांच्याकडे पाठविला. त्यानंतर अमित रंजन यांनी प्रस्तावाला मंजुरी देत ६ महिन्यांसाठी यवतमाळ जिल्ह्यातून तडीपारचा आदेश पारित केला.
ज्वाला समाचार सच का सामना