Breaking News
xr:d:DAEqzBrxtfY:218,j:2018027157538259405,t:24010510

जल जीवन मिशन अंतर्गत शंकरपूर पाणीपुरवठा योजना ठरली कुच कामी

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

* गेल्या अडीच वर्षापासून ग्रामस्थ पाणी विनाच *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर 

चिमूर/शंकरपूर :- जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत हर नल हर घर जल योजनेचे गेल्या अडीच वर्ष अगोदर 22 डिसेंबर 2022 ला माननीय नामदार गुलाबराव पाटील मंत्री पाणीपुरवठा महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते भूमिपूजन चा कार्यक्रम करून शंकरपूर ग्रामस्थांना हर घर नल हर घर जल मिळेल असे सांगण्यात आले तेव्हा पासून शंकरपूर ग्रामस्थांना पाण्याची आस लागली परंतु या योजनेच अजून पर्यंत पाणी न मिळाल्याने ही योजना कुचकामी ठरत आहे‌. या योजनेकरिता शंकरपूर गावा करिता अंदाजे ७०० लक्ष रुपये निधी मंजूर केले व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या विभागाच्या देखरेखाली कंत्राट मे.ज्योती कंट्रक्शन कंपनी चंद्रपूर यांना दिले कामासाठी गेल्या अडीच वर्षांपासून शंकरपूर गावातील रस्ते व भूमिगत गटारे फोडून ठेवल्याने गावातील नागरिक त्रस्त झाले आहे. भूमिगत गटारे फोडून पाईपलाईन टाकली मात्र अंदाजपत्रकानुसार रस्ते व झालेले नुकसान जसेच्या तसे बनवून देण्याची जबाबदारी कंत्राटदाराची आहे गावातील लोकांना गेल्या अडीच वर्षापासून त्याचा त्रास होत आहे.

त्यामुळे फोडलेले रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावी संबंधित काम ग्रामपंचायतचे नसून ग्रामपंचायत इतका मोठा बोजा सहन करू शकत नाही कंत्राट दाराकडून फोडलेले कांग्रेट रस्ते व भूमिगत गटारे दुरुस्त करण्याचे काम दीर्घ काळापासून प्रलंबित आहे संबंधित कंत्राट दाराने काम सुरू करून गावातील रस्ते फोडून ठेवले आहे पूर्ण पने १०० % नळ जोडणी पण केली नाही त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे यासंदर्भात गेले अनेक पत्र व्यवहार केले आहे. तरी देखील मात्र कोणतेही कारवाई करण्यात आली नाही गावातील वाहतुकीस अडथळे निर्माण होतात तसेच पावसा मुळे साचणाऱ्या पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

संबंधित विभाग या कंत्राटदाराशी हात मिळवणी करून नागरिकांना भूलथापा देण्याचा प्रयत्न करीत आहे.गावात झालेले काम अंदाजपत्रकानुसार झाले नाही पाईप लेवल बरोबर नाही पाईप बरोबर वापरले नाही रेती सिमेंट निकृष्ट दर्जाचे वापरले गेले आहे याची माहिती संबंधित विभागाला पत्राद्वारे अनेकदा करून सुद्धा कोणतीही कंत्राटदारावर कारवाई केली नाही याचा अर्थ असा होतो की संबंधित विभाग कंत्राटदाराशी हात मिळवणी केली आहे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित विभाग व कंत्राटदार याच्यावर कायदेशीर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी शंकरपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच अशोक चौधरी व ग्रामस्थ करीत आहेत. येत्या पंधरा दिवसात घरपोच पाणी न मिळाल्यास शंकरपूर गावच्या समस्त महिला संबंधित विभागासमोर घागर मोर्चा घेऊन आंदोलन करणार असल्याचे पत्र पाणीपुरवठा विभागाल दिले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ग्रामपंचायत कार्यालय मोहाळी (नलेश्वर) च्या कोंडवाड्याच्या जागेवर अतिक्रमण

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

नागरिकांनी महाराजस्व अभियानाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved