jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
चिमूर तहसील कार्यालय येथे रात्रीला ट्रॅक्टर जप्त
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर तालुक्यात अवैधरित्या रेतीची वाहतूक व तस्करी जोमात सुरू असतांना अवैध रेती वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर महसूल पथकाने बुधवारी दिनांक ०७/०५/२०२५ ला रात्रीच्या अंधारात १२:०० वाजताच्या सुमारास पळसगाव येथील हुमा नदी पात्रात पकडल्याची घटना घडली असून रात्रीला ट्रॅक्टर चिमूर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.
जप्त केलेले तीनही ट्रॅक्टर हे विना नंबर चे असून पळसगाव येथील अनिल गोकुल सोनेकर, बादल अशोक सोनेकर, विनायक सीताराम ठाकरे यांच्या कडे त्या ट्रॅक्टर होत्या. जप्त केलेल्या मालकांवर दंड ठोठावण्यात येणार आहे. ही कारवाई तहसीलदार श्रीधर राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी, संजय चाचरे, स्वप्नील उमरे ,संदीप मुंडे,चेतन घरकेले या महसूल पथकाने कार्यवाही केली आहे.
ज्वाला समाचार सच का सामना