Breaking News

अवैधरित्या रेतीची वाहतूक करतांना दोन हायवा गावकऱ्यांनी केले भिसी पोलीसांच्या स्वाधीन

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर : – दिनांक.२१/०४/२०२४ ला चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुका अंतर्गत येत असलेल्या जांभूळघाट पासून जवळच असलेल्या पिंपळगाव येथील स्थानिक गावकऱ्यांनी मिळून अवैधरित्या रेतीची वाहतूक करतांना २ हायवा आणि १ पोकलँड मशीन पकडून भिसी पोलिसांच्या ताब्यात दिले. हि घटना रात्री ८ ते ९ वाजताची असून कोटगाव ते पिंपळगाव ला जाणाऱ्या नदी पाठातील रेती हि अवैधरित्या पोकलँड मशीन च्या साहाय्याने हायवा मध्ये भरून वाहतूक करीत असतांना गावकऱ्यांनी व पोलीस पाटील माधव भदुजी झाडे यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

रेतीने भरलेली दोन्ही हायवा वाहन भिसी पोलीस स्टेशन ला जप्त केली असून पोकलँड मशीन हि घटनास्थळीच आहे. वाहतुकीचे साधन उपलब्ध नसल्याने त्यावर सुद्धा जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. सकाळी ट्रेलर च्या साहाय्याने पोलीस स्टेशन भिसी ला पोकलँड मशीन लावण्यात येणार असल्याची माहिती भिसी पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.

तसेच चिमूर शहरातील राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई या मुख्य मार्गाने रात्रीच्या अंधारात हायवा व ट्रॅक्टरच्या साह्याने रेतीची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते मात्र याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष का ? असा प्रश्न यावेळी नागरिकांनी उपस्थित केला आहे. ट्रॅक्टरच्या कर्कश आवाजाने उडाली नागरीकांची रात्रीची झोप. वरीष्ठ अधिकारी व जिल्हा अधिकारी साहेब याकडे लक्ष देतील का?.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved