Breaking News

मी शेवगावकरचा दणका मोडला पंच्यातसमिती शेवगांव आणि पाथर्डीत टँकर घोटाळा व कामात भ्रष्टाचार करणारांचा मणका

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

*!!! शेवगांव पाथर्डी पंचायत समितीतील भ्रष्ट उपअभियंता अनिल सानप याचा आका अहिल्यानगर जि.प.चा सी.ई.ओ. साहेब तर नाही ???*

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे कि पाथर्डी पंचायत समिती तसेच शेवगाव पंचायत समिती येथे सार्वजनिक बांधकाम उप अभियंता व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग अशा दोन विभागात उपअभियंता पदावर *गेल्या कित्येक वर्षांपासून “गुळाच्या ढेपेला चिटकलेल्या मुंगळ्याप्रमाणे” कार्यरत असलेला अनिल सानप गेल्या गेल्या दहा ते बारा वर्षांपासून पाथर्डी पंचायत समिती येथे कार्यरत आहे. व शेवगांव पंचायत समितीचा प्रभारी कारभार सुद्धा हाच अधिकारी पाहत आहे. सर्वात भ्रष्ट अधिकारी म्हणून अनिल सानप यांनी नावलौकिक मिळवलेला आहे.

विशेष म्हणजे पाथर्डी तालुक्यात ग्रामीण पाणीपुरवठा योजना असो किंवा जलजीवन मिशन योजना तसेच विधासभा मतदार संघातील कामे असोत किंवा शेवगाव आणि पाथर्डी या तालुक्याला पैठण येथील नाथ जलाशयातून स्वतंत्र शेवगाव पाथर्डी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सन १९९१ यावर्षी मंजूर करण्यात आली सन १९९७-९८ पासून ते अद्यापपर्यंत ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्ती मेंटेनन्सच्या कामात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार अनिल सानप आणि संबंधित ठेकेदार यांनी संगनमताने केला आहे ज्यामध्ये प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या मेंटेनन्सच्या खरेदी-विक्री साहित्यात तसेच टंचाई सदृशकाळात खानापूर आणि अमरापूर येथे असलेले पाण्याचे उदभव २० टँकर ऐवजी ५० टँकर कागदोपत्री दाखवून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी लाटला आहे.

शासकीय निधीचा गैरवापर केला आहे* यात या टँकर घोटाळ्यात शेवगांव तालुक्यातील एक वजनदार पुढारी सुद्धा सामील आहे तो कोण ??? यामुळे या सगळ्या भ्रष्ट कारभाराची खातेनिहाय चौकशी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग प्रधान सचिव संजय कंधारे यांच्या त्रीसदस्य समिती मार्फत केली जावी आणि अनिल सानप यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात यावे. अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर केलेले शेत शिवार पानंद सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते केवळ कमिशन आणि
टक्केवारीच्या भानगडीत अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सन २०१८- १९ टंचाई काळात टँकर घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अनिल सानप गणेश मिसाळ हे आहेत वर्तमान स्थितीत नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी लोकसभेत शेवगांव आणि पाथर्डी तालुक्यातील जलजीवन मिशनच्या कामाची चौकशीची मागणी केली असता केंद्रीय समिती येऊन पाथर्डीत जलजीवन मिशनच्या कामाची चौकशी करत आहे.

*ताजा कलम*

अहिल्यानगरचे जिल्हा परिषद सीईओ आशिष येरेकर उपअभियंता अनिल सानप यांना क्लीन चीट कस काय देऊ शकतात असा प्रश्न जनतेत चर्चिला जात आहे यावरून अनिल सानप यांचा आका सी.ई.ओ. आशिष येरेकर तर नाही ना असा संशय यायला लागला आहे यामुळे गत दहा ते बारा वर्षात अनिल सानप यांनी केलेल्या ग्रामीण पाणी पुरवठा जलजीवन मिशन जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम अंतर्गत येणारे शेत शिवार पानंद सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते टँकर घोटाळ्या चौकशीचा अहवाल परस्पर गुंडाळून ठेकेदाराची बिले परस्पर अदा करणे इत्यादी भ्रष्ट कारभाराची यादी अनिल सानप यांनी केली असल्याने त्यांना कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करून निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड माहिती अधिकार महासंघाचे शैलेंद्र जायभाये यांनी केली आहे.

*क्रमशः*

*अमरपूरच्या जल उदभवावर कारखिले नावाचा पाथर्डी येथील चतुर्थश्रेणी कर्मचारी टँकर च्या खेपा मोजायला नियुक्त आहे हा “मोज्या” कायम कोणत्या तरी “चक्रात” असतो सतत गैरजहार असतो टँकर घोटाळ्याचा माष्टरमाईंड हाच आहे ??? असे त्याचे वरिष्ठ अधिकारीच म्हणतात*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved