Breaking News

निपुण महाराष्ट्र निपुण शाळा अंतर्गत शिक्षण परिषद संपन्न

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- समूह साधना केंद्र चिमूर अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा चिमूर येथे निपुण महाराष्ट्र निपुण शाळा अंतर्गत शिक्षण परिषद संपन झाली.दिनांक 7 एप्रिल रोजी समूह साधना केंद्र चिमूर अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा चिमूर येथे शिक्षण परिषद संपन झाली. विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेत वाढ करणे. त्यांना मूलभूत साक्षरता आणि संख्याद्यान प्राप्त करून देणे आणि शिक्षकांना या क्षेत्रात मार्गदर्शन करणे हा उद्देश ठेवून ही शिक्षण परिषद घेण्यात आली होती.

पहिल्या सत्रात कार्यक्रमाचे अध्यक्षपदी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीहरी सातपुते उद्घाटक गटशिक्षणाधिकारी रुपेश कांबळे. शिक्षण विस्तार अधिकारी विशाल बोधाने. केंद्र प्रमुख तुळशीराम महाले. गट साधना केंद्र प्रमुख अरविंद आत्राम. रवींद्र बावनकर मंचावर उपस्थित होते. प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून प्रथम सत्राची सुरुवात करण्यात आली. स्वागत गीताने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले 75% पेक्षा जास्त विद्यार्थी निपुण असणारे वर्गशिक्षक यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनेगाव व कवडसी या दोन शाळांना निपुण घोषित करण्यात आले.

उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शनात अध्ययन स्तर निश्चिती. कार्यपद्धती अंमलबजावणी व नियोजन विद्यार्थिनिहाय कृती आराखडा. वाचन. लेखन. कौशल्य. विकसित करण्यासाठी उपाययोजना व विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा इयत्ता ३ व ४ च्या विद्यार्थ्यांनी केले. प्रास्ताविक केंद्र प्रमुख तुळशीराम महाले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मुख्याध्यापिका छाया खोब्रागडे. सहाय्यक शिक्षिका सरिता गाडगे. शिक्षण प्रेमी तनुश्री कामडी यांनी अथक परिश्रम घेतले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved